जि. प. समाजकल्याण सभापतीपदी अंकुश जाधव यांची नियुक्ती..

जि. प. समाजकल्याण सभापतीपदी अंकुश जाधव यांची नियुक्ती..

कुडाळ अनुसूचित जाती मोर्चा कुडाळच्या वतीने जाधव यांचा सत्कार करताना चंद्रकांत वालावलकर…

सिंधुदुर्ग :

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १४ एप्रिल २९२१ रोजी १३० व्या जयंती निमित्त नियोजन बैठक शासकीय विश्रामगृहात येथे संपन्न झाली. यावेळी संपूर्ण जिल्ह्यात भाजप प्रदेशाध्यक्ष सुधाकर भालेराव यांच्या आदेशानुसार गाव, वाड्या, वस्त्यामध्ये बुथनिहाय जयंती साजरी करण्याचे ठरविण्यात आले. त्या संबंधितचे आदेश सभेचे अध्यक्ष विद्यमान समाजकल्याण सभापती अंकुश जाधव यांनी आदेश दिले. जयतीसंबधी नियोजन व मार्गदर्शन यावेळी त्यांनी केले.

सदर महामानवाला अभिवादन व जयंतीचे साजरी करताना कोवीड-१९ दक्षता घेणे आवश्यक आहे. आपण आपली आणि सामाजाची काटेकोर पणे नियमांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले. यावेळी बैठकीत सर्वानुमते एक मताने ठरविण्यात आले.

यावेळी पुन्हा एकदा कुडाळ तालुक्याला समाजकल्याण सभापती निवड झाल्याबद्दल  कुडाळ अनुसूचित जाती व पदाधिकारी यांच्या वतीने अध्यक्ष चंद्रकांत वालावलकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच जिल्हा सरचिटणीस अनंत आसोलकर यांनी पुष्पगुच्छ देऊन जाधव यांचे अभिनंदन केले.

यावेळी जिल्हा सरचिटणीस सुभाष वरावडेकर, कुडाळ अध्यक्ष चंद्रकांत वालावलकर, कणकवली तालुका अध्यक्ष अशोक कांबळे, वेंगुर्ले तालुका अध्यक्ष गुरूप्रसाद चव्हाण, सावंतवाडी सुधाकर जाधव, पुंडलिक कदम,  कणकवली शहर अध्यक्ष  प्रयाग कांबळे, उपाध्यक्ष महेश बिबवणेकर, सुभाष बांबुळकर, मंगेश पावसकर, वासुदेव जाधव उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा