You are currently viewing बांदा-आयी रस्त्यावर चर खोदणार्‍या गॅस कंपनीला बांधकामची “नोटीस”….

बांदा-आयी रस्त्यावर चर खोदणार्‍या गॅस कंपनीला बांधकामची “नोटीस”….

तात्काळ खड्डे बुजवण्याच्या सुचना; अपघात घडल्यास कंपनीला जबाबदार धरणार…

सावंतवाडी

बांदा ते आयी-दोडामार्ग राज्यमार्गावर गॅस पाईप लाईनसाठी खोदाई करणार्‍या महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीला सावंतवाडी सार्वजनिक बांधकाम विभागाने नोटीस बजावली आहे. यात कंपनीकडुन खोदण्यात आलेले चर धोकादायक आहेत. त्यामुळे याबाबत योग्य ती कार्यवाही करा, आवश्यक ठिकाणी रिप्लेक्टर बसवा, चराच्या ठिकाणी सिमेंट गोण्या लावा, अन्यथा अपघात घडल्यास त्याला कंपनी जबाबदार राहील, असा इशारा बांधकाम विभागाच्या अभियंता अनामिका चव्हाण यांच्याकडुन त्यांना देण्यात आल्या आहेत. याबाबत त्यांनी प्रसिद्ध पत्राच्या माध्यमातून संबधित कंंपनीसह आपल्या दोडामार्ग येथील अभियंत्याला कळविले आहे. यात संबधित कंपनीने गॅस पाईप लाईन घालण्यासाठी आपल्याकडे परवानगी मागितली होती. त्यानुसार खोदाईचे काम सुरू आहे. मात्र तुर्तास परिस्थिती लक्षात घेता अनेक ठिकाणी रस्त्यावर खड्डे,माती आहे. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे, अशा परिसरातील ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे याबाबत तात्काळ दखल घेवून योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, अन्यथा एखादा अपघात घडल्यास त्याला सर्वस्वी कंपनी जबाबदार असेल, असे या नोटीशीत म्हटले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × four =