You are currently viewing कोमसाप शाखा सावंतवाडी आयोजित जिल्हास्तरीय दुसरे कवी संमेलन थाटात संपन्न

कोमसाप शाखा सावंतवाडी आयोजित जिल्हास्तरीय दुसरे कवी संमेलन थाटात संपन्न

कोकण मराठी साहित्य परिषद सिंधुदुर्ग निमंत्रित कोमसाप शाखा सावंतवाडी आयोजित जिल्हास्तरीय दुसरे कवी संमेलनास आज दिनांक २६ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ठीक १०.०० वाजल्यापासून सावंतवाडीतील काझीशहाबुद्दीन बहुउद्देशीय सभागृह येथे दिमाखात सुरुवात झाली. तुतारी कवी संमेलनाचे उद्घाटक कवी दीपक पटेकर, प्रमुख पाहुणे संजू परब आदी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने संमेलनाची सुरुवात झाली.
तुतारी कवी संमेलनाचे उद्घाटक उद्योजक तथा कवी दीपक पटेकर यांनी मनोगत मांडताना “साहित्याचे एक अंग असलेली कविता म्हणजे कवींच्या अंतर्मनातील भावना असतात, कविता ही कवींच्या अंतरंगातून स्रवते, कवीच्या मनातील विचार, स्वप्न, सत्य, भूतकाळ, भविष्यकाळ, कवीच्या कल्पना, सामाजिक जाणिवा शब्दरूपानें काव्यातून उमटतात. असे सांगून कवितांचे भेद खोलले. साहित्यिक कितीही मोठा असला, त्याने कितीही पुस्तके प्रकाशित केली तरी जोपर्यंत समाजात, लोकांच्या हृदयात तो स्थान मिळवत नाही तोपर्यंत तो कधीच मोठा होत नसतो. ज्याप्रमाणे ज्येष्ठ लेखक कै.विद्याधर भागवत यांनी ही साहित्य चळवळ पुढे नेली, सामन्यातील सामान्य साहित्यिकाला, लिहित्या हातांना पुढे नेण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या साहित्याला प्रसिद्धी देण्यासाठी झटले त्याचप्रमाणे जिल्ह्यातील ज्येष्ठ साहित्यिकांनी सिंधुदुर्गमधील नवोदित साहित्यिकांना पुढे नेण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे तरच मधू मंगेश कर्णिक, कै.विद्याधर भागवत यांनी सुरू केलेली ही कोमसापची चळवळ वेग घेईल आणि जिल्ह्यातून नवनवीन साहित्यिक निर्माण होतील.”
माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी सावंतवाडीच्या केशवसुत कट्ट्यावरील तुतारी दुरुस्त करून घेण्याची ग्वाही दिली.
कोरोनाच्या अति प्रतिकूल काळानंतर सिंधुदुर्गचे “भाकरी आणि फुल” या मधू मंगेश कर्णिक यांच्या पुस्तकाच्या नावाने कुडाळ येथे झालेल्या जिल्हास्तरीय पहिल्या कवी संमेलनानंतर सावंतवाडी मध्ये आज आद्यकवी केशवसुतांच्या “एक तुतारी दे मजसी आणुनी” या क्रांतिकारी गाजलेल्या कवितेतील “तुतारी” नावाने दुसरे कवी संमेलन संपन्न झाले. सावंतवाडीत झालेल्या तुतारी कविसंमेलन सावंतवाडीतील कवी विठ्ठल कदम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. तुतारी कवी संमेलनाचे उद्घाटन सावंतवाडीतील उद्योजक तथा उदयोन्मुख कवी दीपक पटेकर यांच्या हस्ते पार पडले. संमेलनास प्रमुख पाहुणे सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष सच्चिदानंद परब होते. संमेलनाच्या स्वागताध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिका उषा परब, जिल्हाध्यक्ष मंगेश मसके, जिल्हा कार्यवाह भरत गावडे, तालुकाध्यक्ष प्रा.सुभाष गोवेकर, तालुका सचिव प्रा.प्रतिभा चव्हाण, तालुका उपाध्यक्ष ऍड संतोष सावंत, नकुल पार्सेकर, मालवणी कवी रुजरियो पिंटो, मालवण कोमसाप तालुकाध्यक्ष सुरेश ठाकूर, कुडाळचे माजी अध्यक्ष आनंद वैद्य, प्रभाकर भागवत, दोडामार्गचे कवी तेंडोलकर, दिलीप चव्हाण, मेघना राऊळ, कल्पना बांदेकर, स्नेहा कदम, मनोज परब, मधुरा माणगावकर आदी अनेक कवी, कवयित्री व कोमसापचे जिल्हा, तालुकास्तरीय पदाधिकारी उपस्थित होते. मालवण कोमसाप चे सर्वाधिक प्रतिनिधी या संमेलनात उपस्थित होते. कोमसाप तालुकाध्यक्ष प्रा.सुभाष गोवेकर, जिल्हा सचिव भरत गावडे यांनी छोटेखानी भाषणातून उपस्थितांचे स्वागत केले. तुतारी कवी संमेलनात सर्वच कवींनी एकापेक्षा एक रचना सादर करून वाहवा मिळविली. नकुल पार्सेकर यांनी कवी केशवसुत यांच्या “एक तुतारी दे मज आणुनी” या काव्यवाचनाने संमेलनाची सुरुवात झाली. कवी रुजारियो पिंटो, कवी दीपक पटेकर, कवयित्री मधुरा माणगावकर, सुनंदा कांबळे, मनोज परब, कवी विठ्ठल कदम आदींनी अतिशय उत्तम कविता सादर केल्या. कवी सांबारी यांनी कोरोनावरील कविता सादर करून कोरोनाकाळातील तक्रारी हास्यरूपात मांडल्या. तत्पूर्वी सातार्डा, ता.सावंतवाडी येथील लेखक समीर वेंगुर्लेकर यांच्या “अर्ध्या घडीचा डाव” या कादंबरीचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. सूत्रसंचालन प्रा.प्रतिभा चव्हाण यांनी केले, प्रास्ताविक संतोष सावंत तर आभार संमेलनाध्यक्ष कवी विठ्ठल कदम यांनी मानले.
दुपारच्या स्नेहभोजनाच आस्वाद घेऊन कार्यक्रमाची यशस्वी सांगता झाली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nine − 4 =