You are currently viewing प.सं.च्या नूतन इमारतीमधून पारदर्शक, लोकाभिमुख कारभार करण्याची जबाबदारी सदस्य व अधिकार्‍यांची…!

प.सं.च्या नूतन इमारतीमधून पारदर्शक, लोकाभिमुख कारभार करण्याची जबाबदारी सदस्य व अधिकार्‍यांची…!

केंद्रीयमंत्री नारायण राणेंचे प्रतिपादन…!

कणकवली

कणकवली पंचायत समितीच्या नूतन इमारातीचे भूमिपूजन माझ्या हस्ते झाले होते. याच इमारातीचे उद्घाटन माझ्या हस्ते झाल्याबद्दल मला अभिमान आहे. ही इमारात उभी राहण्यासाठी कणकवली पंचायत समितीच्या सर्व सदस्यांनी व अधिकार्‍यांनी मेहनत घेतली. त्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे सुसज्ज इमारात उभी राहिली आहे. आता या इमारातीमधून पारदर्शक व लोकाभिमुख कारभार करण्याची जबाबदारी सदस्य व अधिकार्‍यांवर आली आहे. तसेच कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्याला लोकप्रतिनिधी होण्याचे पद मिळते. या पदाचा वापर त्यांनी जनतेची सेवा व आपल्या भागाचा विकास करण्यासाठी करावा.पंचायत समितीच्या नूतन इमारातीतून जनतेचे प्रश्‍न व समस्या मार्गी लावण्यासाठी पदाधिकारी व अधिकार्‍यांनी झटले पाहिजे. कणकवली तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आता पदाधिकारी व अधिकार्‍यांनी एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून जनतेची सेवा करावी, अशी अपेक्षा केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केली.

कणकवली पंचायत समितीने उभारलेल्या नूतन इमारातीचे उद्घाटन सोहळ्यानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात श्री. राणे बोलत होते. यावेळी कणकवली मतदारसंघाचे आमदार नीतेश राणे, माजी खासदार डॉ. नीलेश राणे, जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. संजना सावंत, माजी आमदार तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन
तेली, जि.प.चे बांधकाम समितीचे सभापती महेंद्र चव्हाण, समाजकल्याण समितीचे सभापती अकुंश जाधव, कणकवली पंचायत समितीचे सभापती मनोज रावराणे, उपसभापती प्रकाश पारकर, माजी सभापती तथा भाजपचे तालुकाध्यक्ष संतोष कानडे, जिल्हा परिषद सदस्या श्रीया सावंत, पंचायत समिती सदस्य भाग्यलक्ष्मी साटम, सुजाता हळदिवे, महेश लाड, गणेश तांबे, मिलिंद मेस्त्री, दिलीप तळेकर, हर्षदा वाळके, तुळशीदास रावराणे, प्रज्ञा ढवण यांच्यासह पंचायत समितीचे माजी व आजी सदस्यांसह व तालुक्यातील सरपंच व उपसरपंच उपस्थित होते.

आमदार नीतेश राणे म्हणाले, कणकवली पंचायत समितीने आजपर्यंत नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत. या उपक्रमांचे अनुकरण महाराष्ट्राने केले आहे.
पंचायत समितीच्या नूतन इमारत उभारण्यासाठी असंख्य अचडचणींचा सामना सदस्य व अधिकार्‍यांना करावा लागला. मात्र, त्यांनी यावर मात करून इमारात
उभारणीचे आव्हान पेलून या इमारतीची उभारणी केली आहे. ही इमारत उभारून सदस्य व अधिकार्‍यांनी एक आदर्शवत काम केले आहे. कोरोनाच्या काळातही पंचायत समितीने उत्कृष्ट काम करून जनतेची चांगली सेवा दिली. पंचायत समितीच्या सदस्यांना शासनाकडून तटपुंजा निधी दिला जात असून हा निधी वाढवून देण्याबाबत आपण शासनाकडे पाठपुरवठा करणार असल्याचे सांगून कणकवली पंचायत समितीचा गावठी आठवडा बाजार सुरु करण्याचा उपक्रम स्तुत्य असल्याचे त्यांनी सांगितले. इमारत उभारणीच्या कामात सत्ताधार्‍यांनी आडकाठी आण्याचे काम केले असून भविष्यात होणार्‍या विकासकामांमध्ये त्यांनी आठकाठी करून घाणेरडे राजकारण करू, नये आवाहन त्यांनी केले.

नीलेश राणे म्हणाले, सिंधुदुर्गाच्या विकासात खो घालण्याचे काम सत्ताधार्‍यांकडून केले जात आहे. हे जिल्ह्यासाठी घातक आहे. त्यांचे हे मनसुबे आम्ही उधळून लावून या कामी आम्हाला सिंधुदुर्गवासीयांनी सहकार्य करावे. पालकमंत्र्यांनी व शिवसेने विकासात राजकारण आणता जिल्ह्याच्या विकासासाठी जास्तीत जास्त कशाप्रकार निधी मिळेल यासाठी काम करावे, अशी अपेक्षा श्री. राणे यांनी व्यक्त करताच पंचायत समितीच्या सदस्य व अधिकार्‍यांनी एकसंध राहून जनतेची सेवा करावी.

राजन तेली म्हणाले, जिल्ह्यातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. या पालकमंत्री व शिवसेना जबाबदार आहे. रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी निधी देण्याबाबत ठाकरे सरकार उदासीन आहे. तसेच कणकवली पंचायत समितीचे नाविन्यपूर्ण उपक्रम कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगून 14, 15 व्या वित्ती आयोगातून ग्रामपंचायतींना थेट निधी देण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतल्यामुळे आता ग्रामपंचायतीही सक्षम होत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी संतोष कानडे यांनी केंद्रीयमंत्री नारायण राणे, नीलेश राणे, नीतेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जनतेची सेवा अविरतपणे करणार असल्याचे सांगितले. पंचायत समितीच्या नूतन इमारातीचेे उद्घाटन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. त्यानंतर कणकवली पंचायत समितीच्यावतीने केंद्रीयमंत्री नारायण राणे, डॉ. नीलेश राणे, नीतेश राणे सत्कार करण्यात आला. तसेच ही इमारत उभारण्यासाठी विशेष प्रयत्न केलेल्या जि.प.च्या बांधकाम विभागाचे उपअभियंता आर.पी.सुतार व त्यांच्या टीम आणि ठेकेदार नंंदकिशोर तावडे देखील नारायण राणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सभापती मनोज रावराणे यांनी केले. सूत्रसंचालन राजेश कदम व नितीन पाटील यांनी केले तर आभार प्रकाश पारकर यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

17 − 8 =