You are currently viewing मनसे शहर मध्यवर्ती कार्यालयाचे सरचिटणीस परशुराम उपरकर यांच्या हस्ते उद्घाटन…

मनसे शहर मध्यवर्ती कार्यालयाचे सरचिटणीस परशुराम उपरकर यांच्या हस्ते उद्घाटन…

सावंतवाडी

येथे आज मनसे मध्यवर्ती कार्यालयाचा मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर आणि भांडुप च्या माजी नगरसेविका सौ अमिषा माजगावकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून आणि फित कापून उद्घाटन करण्यात आले.

यावेळी कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे, सावंतवाडी शहर अध्यक्ष आशिष सुभेदार, दया मेस्त्री, संतोष भैरवकर, सुमन तारी, शुभम सावंत, अभय देसाई, दीपक बुरान, बाळा पावसकर, लक्ष्मीकांत हरमलकर, रोशन गावडे, अमोल माजगावकर, स्नेहा मुळीक आदी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी माजी आमदार परशुराम उपरकर बोलताना म्हणाले की, स्थानिक आमदार दीपक केसरकर हे केवळ निवडणुका बघून घोषणा करतात, परंतु वास्तवात काही करत नाहीत. येथील युवकांना रोजगार प्राप्त व्हावा म्हणून चश्मा कारखाना, यारखे अनेक कारखाने येतील असे आश्वासन दिले होते. परंतु, ते कारखाने अद्याप आले नाहीत. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तरी ते कारखाने येतील का? असा खोचक सवाल त्यांनी उपस्थित केला. यावेळी सावंतवाडीतील कार्यालय हे इतर पक्षाच्या कार्यालया प्रमाणे केवळ निवडणूक काळातच राहणार नसून, निवडणुकांनंतर देखील हे कार्यालय आहे तसेच राहणार आहे. या कार्यालयातून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी मनसे नेहमी पुढे राहणार आहे. पक्ष प्रमुख राज ठाकरे यांचे आचार विचार सर्वसामान्याच्या घरात पोचवण्यासाठी काम केले जाईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. यावेळी मनसेकडून दिवाळी मध्ये घेण्यात आलेल्या किल्ला सपर्धेतील विजेत्यांना बक्षीस समारंभ संपन्न झाला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

15 + one =