You are currently viewing तेरवण रामघाट मध्ये पाटणे येथील प्रार्थना स्थळांची अज्ञातांकडून तोडफोड

तेरवण रामघाट मध्ये पाटणे येथील प्रार्थना स्थळांची अज्ञातांकडून तोडफोड

दोडामार्ग
दोडामार्ग तालुक्यातील तेरवण मेढे राम घाट येथे दोडामार्ग व चंदगड तालुक्यातील पाटणे येथील ख्रिस्ती बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या ब्रिटिशकालीन व प्रार्थना स्थळांची अज्ञातांकडून तोडफोड होण्याचा दुर्दैवी प्रकार समोर आला आहे हे कृत्य करणाऱ्यांनाचा पोलिसांनी योग्य तपास करावा व यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी पुढे येत आहे. पाच वर्षापूर्वी दोडामार्ग तालुक्यातील तेरवण मेढे रामघाट येथे दोडामार्ग तालुक्यातील पाटणे येथील ख्रिस्ती बांधवांनी एकत्रित येऊन धार्मिक विधीसाठी इमारत उभी करून, तिथे उभ्या करण्यात आलेल्या क्रॉससाठी छप्पर बनविले व बसायला इमारत बांधली होती गेल्या दोन दिवसापूर्वी कोणी अज्ञात व्यक्तीने इमारतीमध्ये असलेल्या साहित्य खुर्च्या, कपाट, टेबल व क्रॉसची मोठ्या प्रमाणात मोडतोड करण्यात येऊन साहित्याचे नुकसान करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच ग्रामपंचायत सदस्य व सामाजिक कार्यकर्ते मायकल लोबो यांनी स्थानिक पोलिस प्रशासन, पोलीस पाटील, तलाठी यांना घटनेची माहिती देऊन प्रशासनाच्या उपस्थितीमध्ये पंचनामा करण्यात आला. प्रशासनाने तातडीने घटनेचे गांभीर्य ओळखून याची दक्षता घेऊन संबंधित घटनेतील अज्ञात व्यक्तीचा लवकरच शोध घेऊन कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

वरील घटनेबाबत आमदार दीपक केसरकर यांची शिष्टमंडळाने भेट घेऊन त्यांना लक्ष घालण्याची विनंती करून संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी केली. त्यावर आमदार केसेकर यांनी संबंधित व्यक्तीवर कारवाईचे आश्वासन दिले. संबंधित व्यक्तीचा प्रशासनाने लवकरात लवकर शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
वरील घटना अतिशय निंदनीय असून याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र अल्पसंख्यांक ख्रिस्ती विकास परिषदेचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष वीक्टर फर्नांडिस, उपाध्यक्ष कारमिस अल्मेडा तसेच पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा