You are currently viewing सिने – टेली कलाकार सेवा संघाच्या जिल्हाध्यक्षपदी सौ. संजना हळदिवे

सिने – टेली कलाकार सेवा संघाच्या जिल्हाध्यक्षपदी सौ. संजना हळदिवे

*सिने – टेली कलाकार सेवा संघाच्या जिल्हाध्यक्षपदी सौ. संजना हळदिवे*

*कणकवली ( प्रतिनिधी)*

कोकण एक्सप्रेस डिजिटल न्यूज चैनल च्या संपादिका संजना संजय हळदीवे यांची सिने- टेली कलाकार सेवा संघाच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
सिने- टेली कलाकार
सेवा संघाचे पूर्व मुंबईचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, सुनिल गोडबोले, किशोर पाटील, अनामिका सावंत, सचिव डॉ. वैष्णवी बुटे यांनी संजना हळदीवे यांचे नाव जाहीर केले.
कलाकार संघ देशात आणि सहा राज्यात कलाकारांसाठी कार्यकरत आहे.
ही संस्था राज्यातील मराठी चित्रपटसृष्टी व नाट्यसृष्टी यासाठी आवश्यक असलेले अभ्यासक्रम तसेच लेखन, दिग्दर्शन, अभिनय अभ्यासक्रम चालविण्यासाठी सरकार प्रमाणेच आणि महाराष्ट्र राज्य चित्रपट महामंडळ प्रमाणित असतील, अशाच कोर्सेससाठी तसेच मराठी निर्मात्यांना माफक दरात मोबदला घेवून चित्रिकरणाला जागा उपलब्ध करून देण्याचा आणि सभासदांना काम मिळवून देण्याचा प्रयत्न सिने- टेली कलाकार संघाच्या माध्यमातून करण्यात येतो. अशा प्रकारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लेखक, दिग्दर्शक, कलाकार आदीं संघटनेच्या माध्यमातून काम करणार असल्याचे हळदिवे म्हणाल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen + eight =