You are currently viewing हळवल रवळनाथ शिवराई मंदिरात उद्या जत्रोत्सव…

हळवल रवळनाथ शिवराई मंदिरात उद्या जत्रोत्सव…

कणकवली

तालुक्यातील हळवल गावचे जागृत देवस्थान श्री देव रवळनाथ शिवराई मंदिरात वार्षिक जत्रोत्सव बुधवार २२ डिसेंबर रोजी होणार आहे.
हळवल गावचे ग्रामदैवत श्री रवळनाथ शिवराई मंदिरात वार्षिक जत्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. सकाळी श्रींची विधिवत पूजा त्यानंतर धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. रात्री तरंग व भाविक यांच्यासह मंदिर प्रदक्षिणा होणार आहे व त्यानंतर रात्री उशिरा बाळकृष्ण गोरे दशावतार नाट्य मंडळाचा दशावतार नाट्य प्रयोग होणार आहे. नवसाला पावणारे देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या या मंदिरात भाविकांची अलोट गर्दी असते या जत्रोत्सवात भाविकांनी उपस्थित राहून उत्सवाची शोभा वाढवावी असे आवाहन हळवल ग्रामस्थांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा