You are currently viewing माणसात राहू या
  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

माणसात राहू या

पुणे येथील ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ.अर्चना मायदेव यांचा अप्रतिम लेख.

माणसात राहू या

एकमेकांसाठी कान होऊ या

आता तुम्ही म्हणाल की,”कान होऊ या म्हणजे काय?” तर माणसात राहण्यासाठी हे अतिशय महत्वाचे आहे. माणसात राहण्यासाठी संवाद होणे आवश्यक आहे .तो संवाद हवा तर एकमेकांचे ऐकून घेणेही महत्वाचे आहे.या अर्थाने मी एकमेकांचे कान होऊ या असे म्हंटले आहे.
सगळी कडे आपण पहात आहोत की प्रत्येकाला काही न काही सांगायचे असते,पण कोणालाच इतका वेळ नसतो.मग माणूस मनातल्या मनातच ते ठेवून देतो आणि ती विचारांची उतरंड वाढत जाते आणि त्याचा परिणाम म्हणजे मनाच्या डॉ.कडे जाणे म्हणजेच मानसोपचार तज्ज्ञा कडे जाणे, समुपदेशका कडे जाणे हा होय. हे का होते तर माणूस समाज प्रिय आहे.त्याला आपल्या आजूबाजूला माणसं हवी असतात.आणि त्यातून त्यांनी आपल म्हणणं ऐकावं असही वाटतं असत.पण मला वाटतं प्रत्येकाने स्वतःला हा प्रश्न जरूर विचारावा की आपण कोणासाठी किती वेळ काढतो,आपण समोरच्याच खरच मन लावून ऐकतो का? मैत्रिणीला मित्राला आपल्याला खूप काही सांगायचं असत पण फोनवर फक्त “हां आणखी काय विशेष”?ह्याच्या पुढे संभाषणाची गाडी जात नाही.कारण पलीकडच्या व्यक्तीला विश्वास नसतो की खरच आपल म्हणणं ऐकण्यासाठी हा कान आसुसला आहे. हा कान का महत्वाचा आहे ते सांगते . मी जेव्हा M.A. ला प्रवेश घेतला (तसा मी खूपच उशिरा प्रवेश घेतला म्हणजे वयाच्या६०व्या वर्षी )तेव्हा महाविद्यालयात माझ्या बरोबर वयाच्या ३०ते४०वर्ष पर्यंतच्या मुली होत्या.सगळ्या लग्न झालेल्या.खूप वर्षांनी महाविद्यालयात पुन्हा यायला मिळालं म्हणून खूप आनंदित झालेल्या.त्यांना एकमेकींशी किती बोलू आणि किती नाही आस व्हायचं. पण सगळ एकाच आणि पहिल्याच भेटीत नाही n सांगता येत. मी हे सगळ दुरून बघत होते .कधी त्यांच्या संभाषणात भाग ही घेत होते.पण दिवस एक मुलगी माझ्या जवळ आली आणि म्हणाली,”ताई चला न कॅन्टीन मधे चहा घ्यायला जाऊ या”.मला माहित नाही तिने एकदम मलाच का म्हणावं चहाला चला म्हणून?मी पण लगेच चल म्हणले.काहीही आढेवेढे न घेता मी हो म्हणण्याचा तिला इतका आनंद झाला होता म्हणून सांगू.आणि चहाचा पाहिला घोट घेतला बरोबर ती je suru झाली तिच्या आयुष्य बद्दल सांगायला .तिच्या घरच्या अडचणी,तिचे प्रश्न,तिच्या आकांक्षा,स्वप्न या सगळ्या बद्दल ती भरभरून बोलत होती.मी नुसत तिच्या कडे हसून बघत होते,मधूनमधून तिला प्रोत्साहन देत होते.तिला अस वाटलच नाही की या ताईं ची आणि आपली फार थोड्या दिवसांची ओळख आहे.तिच्यासाठी त्यादिवशी मी तीचा ऐकणारा *कान* झाले होते.त्या नंतर ती नेहमी माझ्याशी बोलायची अगदी भरभरून बोलत असे.त्यानंतर ती मला कधीच दुःखी कष्टी, अबोल अशी दिसलीच नाही.कारण तिच्यासाठी मी तिचा हक्काचा कान झाले आहेतेव्हा मला वाटलं की मी एक जीव मनाच्या अंधारात जाण्यापासून वाचवला..मला वाटतं की माणसाने सगळच सांगू नये समोरच्याला पण ज्या वेळेस आपल्याला आतून वाटत असतं की कोणाजवळ तरी आपल मन मोकळं करायला पाहिजे तेव्हा अशी व्यक्ती आधी पासूनच आपल्या संग्रही ठेवायची असते म्हणजे आयुष्यात कधीच मानसोपचार तज्ज्ञाची
आवश्यकता वाटत नाही.कान सगळ्यांनाच असतात पण जेव्हा आपण म्हणतो की,”जीवाचे कान करून मी ते ऐकलं”असं जेव्हा होतं तेव्हा ते कान खऱ्या अर्थाने *कान* होतात.कारण त्या कानातून समोरच्याने सांगितलेले आपल्या काळजा पर्यन्त पोहोचलेले असते. त्याच्या भावना, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझं कुणीतरी कान देऊन ऐकलं ह्याचा आनंद खूप काही सांगून जातो. आणि पुढच्या वेळेस जर तशी परिस्थिती आली तर त्याला त्या भावना, लढण्याचं बळ देऊन जातात.
या साठी कोणाचे तरी ऐकण्यासाठी आपण कान व्हावं, म्हणजे कौन्सिलर कडची रांग कमी होईल,आत्महत्या कमी होतील.कोणाचीतरी जीवनाची घसरलेली गाडी पुन्हा रुळावर येईल आणि तो तुम्हाला काळजापासून दुवा देईल आणि एक जीव वाचवल्याचं समाधान आणि पुण्य तुम्हाला लाभल्या शिवाय राहणार नाही. आपल्या आजू बाजूला आजच्या परिस्थितीत खूप जण असे भेटतील तुम्हाला.सध्या तरुण मुलामुलींचे jobs गेलेत त्यामुळेही ही मुलं भरकटल्यासारखी झाली आहेत.
तर, चला मग आपण एकमेकांचे ऐकणारे कान होऊ या.सल्ले देणारे खूप असतात,पण मनापासून आपलं म्हणणं ऐकणारे खूप कमी असतात.
धन्यवाद.

सौ. अर्चना मायदेव
पुणे

प्रतिक्रिया व्यक्त करा

sixteen − 14 =