You are currently viewing पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिनी राष्ट्रवादी पक्षाकडून कार्यक्रमांचे आयोजन

पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिनी राष्ट्रवादी पक्षाकडून कार्यक्रमांचे आयोजन

तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी

सावंतवाडी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा वाढदिवस १२ डिसेंबर रोजी साजरा होत असून, त्यानिमित्त सावंतवाडी तालुक्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी १० डिसेंबर रोजी वक्ता प्रशिक्षण होणार असून, यासाठी प्रदेश वरून वक्ते येणार असून, येथील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच १२ तारीख ला तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांच्या समर्थ कृपा निवास येथील हॉल वर ऑनलाईन पद्धतीने शरद पवार यांचा वाढदिवस साजरा होणार असून, यावेळी अध्यक्ष शरद पवार हे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. अशी माहिती तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे.

तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, महिला जिल्हाध्यक्षा सौ रेवती राणे, शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर, जिल्हा उपाध्यक्ष शफीक खान, जिल्हा कार्याध्यक्ष उद्योग-व्यापार हिदायतुल्ला खान, महिला जिल्हाध्यक्ष उद्योग- व्यापार सौ. दर्शना बाबर देसाई, राष्ट्रवादी युवती जिल्हाध्यक्ष सौ. सावली पाटकर, माजी नगरसेविका सौ. अफरोज राजगुरू, महिला तालुकाध्यक्ष रिद्धी परब, युवती तालुकाध्यक्ष जहिरा ख्वाजा, महिला शहराध्यक्ष सौ. रंजना निर्मळ, अल्पसंख्यांक सरचिटणीस, अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष इफ्तेकार राजगुरू, असिफ ख्वाजा, तालुका उपाध्यक्ष बावतीस फर्नांडिस, तालुका सदस्य संतोष जोईल, अर्शद बेग उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा