You are currently viewing थंडी गुलाबी हवा ही शराबी..
  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

थंडी गुलाबी हवा ही शराबी..

जागतिक मराठी साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी श्रीकांतजी दीक्षित यांचा ललितलेख

खरंच हा डिसेंबर महिना किती वाट पहायला लावतो…किती आतुरतेने वाट पहातात सारी..अगदी वर्षाखेरीस येतो.. शेंडेफळ ना हे!!.. पण हिरव्यागार निसर्गाची पर्वणी तर धुक्याची शाल पांघरून येणारी पहाट…प्राजक्ताची लाल केशरी पायघड्या घालून होणारी दिवसाची सुरूवात.. मोत्यासम दवबिंदूंची उधळण मन मोहीत करून जाते. मग येते ती रूपगर्विता थंडी गुलाबी..हलकेच घ्यावे कवेत विसरून सारे देहभान..

*धुंद होई मन*
*बेधुंद अल्लड हवा*
*आली थंडी गुलाबी*
*चाखण्या प्रणय धुंद मेवा*

दाटलेल्या अंधारात दूर दिव्यांची रांग..तुझी रमणिय सोबत!!.. नभातील पौर्णिमेच्या चंद्राचा शुभ्र प्रकाश…तारकांचे पायी पैंजन..रूणझूण मनीचे गुंजन!!.. केसात माळलेला सुगंधित गजरा..अशा ह्या गुलाबी थंडीत काही न बोलताही कंठ दाटलेला..तर स्पर्श गोठलेला..बंध भावनांचे मनास वेडावती..हलकेच कवेत येता तू, सखे हृदयी झंकारल्या तारा. साज संगीत चढले कानात बोलता तू.. “आय लव्ह यु!!” अधिर मन झाले रे!! चक्क शिशिरातही प्रितीचा वसंत मनामध्ये फुलला. हलकेच घेऊन हातात हात हळूच दाबला..चांदण्याच्या उजेडात तुझा चेहराही लाजला.. झालीस अबोल तू..सुखावलेल्या स्पर्शाने..! मिठीतील उबीने..सप्तरंगी झालर लावुनी मनही डोलत राहिले…गार हवेच्या स्पर्शाने..बोचरी हवा लाडिक चाळा करते अंगावरी.. उमटती शहारे अंतरंगातील मनावर. बिलगूनी श्वासात श्वास अलवार स्पर्श..फुलविती मयुरपंखी अपेक्षाचे संगीत.

*शिरशिरी हुडहुडी*
*मोहरते सारे अंग*
*मोहवितो मना*
*प्रितीचा सुगंध*

अशा या गुलाबी थंडीच्या गुलाबी शुभेच्छा!!

🦚💫🦚💫🦚💫🦚💫🦚

*श्रीकांत दीक्षित, पुणे.*

प्रतिक्रिया व्यक्त करा

fourteen − eleven =