You are currently viewing नवलराज काळे यांची भारतीय जनता पार्टी भटक्या विमुक्त आघाडीच्या सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष पदी निवड

नवलराज काळे यांची भारतीय जनता पार्टी भटक्या विमुक्त आघाडीच्या सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष पदी निवड

काळे यांची वयाच्या 28 व्या वर्षात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकारणात दमदार एन्ट्री

वैभववाडी

वैभववाडी तालुक्याचे सुपुत्र ग्रामपंचायत सडुरे शिराळे चे विद्यमान सदस्य श्री नवलराज विजयसिंह काळे यांची भारतीय जनता पार्टी भटक्या विमुक्त आघाडीच्या सिंधुदूर्ग जिल्हा अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.काळे भाजपा युवा मोर्चाचे वैभववाडी तालुका सरचिटणीस पदावर कार्यरत होते तसेच ते कोकण धनगर समाजाचे नेतृत्व करत आहेत.भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस व ग्रामपंचायत सदस्य पदावरून केलेल्या उत्कृष्ठ कार्याची व संघटनात्मक कार्यप्रणालीची दखल घेत पक्ष श्रेष्ठींनी त्यांना भाजपा भटक्या विमुक्त आघाडी सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे. काळे यांच्या रूपाने भाजपा ला सिंधुदूर्ग जिल्ह्यात एक नवीन चेहरा मिळाला आहे. 21 नोव्हेंबर 2021 रोजी पनवेल येथील भाजपा कार्यालयात आयोजित केलेल्या भाजपा भटक्या विमुक्त आघाडी कोकण विभागाच्या बैठकीचे नवलराज काळे यांना आमंत्रण दिले होते व या बैठकीत पक्षाकडून जबाबदारी दिली जाणार आहे अशी कल्पना दिली होती. काळे यांनी आमदार नितेश राणे, जिल्हा अध्यक्ष राजन तेली,वैभववाडी तालुका अध्यक्ष नाशीर काझी व इतर स्थानिक पदाधिकारी यांना कल्पना देत सदर बैठकीत हजेरी लावली.या बैठकीत भटक्या विमुक्त आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा.आमदार नरेंद्र पवार यांच्या मान्यतेने, सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष मा.राजन तेली यांच्या सहमताने नवलराज काळे यांच्या सामाजिक व राजकीय कार्याचा आढावा घेत.भाजपा VJNT महाराष्ट्र उपाध्यक्ष तथा कोकण विभाग प्रभारी गोविंदा गुंजाळकर व VJNT कोकण विभाग अध्यक्ष श्रीराम विधाते यांनी निवड पत्र देऊन शाल, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.

या वेळी पनवेल तालुक्याचे कार्यसम्राट आमदार भाजपा जिल्हा अध्यक्ष श्री प्रशांत ठाकूर साहेब,भाजपा महाराष्ट्र धनगर समाज अध्यक्ष ॲड.मिलिंड जाडकर,डॉ.समिर भारती महिला अध्यक्षा कोकण VJNT,भास्कर यमकर कोकण उपाध्यक्ष, अशोक शेळके महाराष्ट्र उपाध्यक्ष युवक आघाडी, बबनराव बारगज रायगड जिल्हा अध्यक्ष,विद्या तामखडे महिला जिल्हा अध्यक्ष रायगड, बाळा केंद्रे ठाणे जिल्हा अध्यक्ष ,धनगर समाज नेते रायगड आनंदराव कचरे, लक्ष्मण शेळके (शिराळे वैभववाडी) रामचंद्र शेळके (उंबर्डे वैभववाडी) संजय सातपुते नविमुंबई, संदीप माने ठाणे जिल्हा VjNT व इतर मान्यवर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.ही निवड भटक्या विमुक्त आघाडीच्या धनगर समाज महाराष्ट्र अध्यक्ष ॲड.मिलिंद जाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.तसेच ही निवड झाल्याबद्दल वैभववाडी तालुक्यातील सडूरे शिराळे या ग्रामपंचायत मधील धनगर समाज बांधवांनी पुष्गुच्छ देऊन नवी मुंबई येथे नवलराज काळे यांचा जाहीर सत्कार केला.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा