सिंधुदुर्गच्या नेमबाजांची पूर्व राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी निवड

सिंधुदुर्गच्या नेमबाजांची पूर्व राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी निवड

अतुल नाखरे यांना सुवर्ण पदक

बांदा

गोवा राज्याचे प्रतिनिधित्व करणारे सावंतवाडीचे नेमबाज अतुल नाखरे यांनी २५ मीटर नेमबाजी प्रकारात सुवर्ण पदक पटकाविले. तसेच श्रीया नाखरे हीने १० मीटर पिस्तूल प्रकारात सबयुथ गटात प्रथम क्रमांक मिळवत पूर्व राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत आपले स्थान पक्के केले आहे.

महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधीत्व करणारे जिल्हयातील ६ खेळाडू नुकत्याच घेण्यात आलेल्या कॅप्टन एस. जे. इजीकल मेमोरीअल महाराष्ट्र स्टेट शूटींग चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. यात साहिश दिगंबर तळणकर (दोडामार्ग) याने सबयुथ गटात १० मी. पीस्तूल प्रकारात ४०० पैकी ३६२ गुण मिळवून चौथा क्रमांक मिळविला. तसेच स्वानंद प्रशांत सावंत याने ३४८ गुण, आयुश दत्तप्रसाद पाटणकर ३४१ गुण तर यश नामदेव तांबे याने ३३२ गुण मिळविले.

प्रतिक्रिया व्यक्त करा