You are currently viewing मुख्यमंत्री रोजगार निर्मित्ती योजना गतिमानता पंधरवड्यास 23 जानेवारीपर्यंत मुदतवाढ

मुख्यमंत्री रोजगार निर्मित्ती योजना गतिमानता पंधरवड्यास 23 जानेवारीपर्यंत मुदतवाढ

मुख्यमंत्री रोजगार निर्मित्ती योजना गतिमानता पंधरवड्यास 23 जानेवारीपर्यंत मुदतवाढ

सिंधुदुर्गनगरी

जिल्हा उद्योग केंद्रामार्फत जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री रोजगार निर्मित्ती योजना गतिमानता पंधरवड्यास दि.9 ते 23 जानेवारीपर्यत  मुदतवाढ देण्यात आलेली आहे. त्यानिमित्ताने जनजागृती मोहिम हाती घेण्यात आली असल्याची माहिती जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्रीपाद दामले यांनी केले आहे.

विकास आयुक्त (उद्योग), उद्योग संचालनालय, मुबंई यांनी दि. 18 डिसेंबर ते 30 डिसेंबरपर्यंत गतिमान पंधरवडा घोषित केलेला होता. विकास आयुक्त  (उद्योग) मुबंई यांच्या निर्देशानुसार गतिमान पंधरवड्यास दि.9 ते 23 जानेवारीपर्यत पुन्हा मुदतवाढ देण्यात आले आहे.

या पंधरा दिवसांमध्ये जिल्हा उद्योग केंद्र यांच्या तर्फे संपूर्ण जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेची जनजागृती मोहम हाती घेण्यात येणार आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेचे जास्तीत जास्त प्रस्ताव या माध्यामातून गोळा करणे आणि ते ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे पोर्टलवर भरणे, माहिती देणे, प्रचार करणे इ. करण्यात येणार आहे. या पंधरवडा मोहिमेत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेचे अर्ज निःशुल्क भरून दिले जातील. जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात बॅनर व ऑडियोच्या माध्यमातून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेची प्रचार व प्रसिद्धी करण्यात येणार आहे. या योजनेतून जास्तीत जास्त लाभाथ्यांचे अर्ज प्रस्ताव त्यांच्या कागदपत्रासहित स्वीकारून त्यांची तात्काळ छाननी होणार असून बँकेकडे अशी प्रकरणे लवकरात लवकर आणि प्राधान्याने मंजूर करून घेण्याचा प्रयत्न जिल्हा उद्योग केंद्र, करणार आहे. यामध्ये बँकेकडून उपयोगिता प्रमाणपत्रे जमा करणे, बँकेत रखडलेली मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेची प्रकरणे मार्गी लावणे हा मुख्य हेतू आहे.

दि. 9 ते 23 जानेवारी 2024 पासून हा पंधरवडा सुरू झाला असून या कालावधीमध्ये सिंधुदुर्गमध्ये अभियांत्रिकी महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तंत्रनिकेतन महाविद्यालय, पंचायत समिती/ग्रामपंचायत, जिल्हा परिषद येथे प्रचार व प्रसार करण्यात येणार आहे. संबंधित अधिकारी / उद्योग निरीक्षक हे त्या वाहनासोबत हजर राहून उपस्थितांना मार्गदर्शन करतील,त्यांचे अर्ज जागेवरच नि:शुल्क भरुन घेतील. त्यांच्या शंका व अडचणींचे निराकरण करतील, तरी लाभाथ्यांनी या जनजागृती मोहिमेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र, सिंधुदुर्ग यांच्याकडून करण्यात आले आहे.

गतिमानता पंधरवड्यात तालुकानिहाय मेळावे पुढीलप्रमाणे आयोजित केले आहेत.

अ.क्र मेळावा ठिकाणे दिनांक
1 सातार्डा, आजगांव, सावंतवाडी 11/1/2024
2 तळकट, दोडामार्ग 12/1/2024
3 कुडाळ, माणगांव 15/1/2024
4 विजयदुर्ग, पडेल,देवगड 16/1/2024
5 कुणकावळे, चाफेखोल, वरची गुरामवडी, नांदोस, तिरवडे, खराडे/ पेंडुर, मालवण 17/1/2024
6 नेरुळ, वालवल, कुडाळ 18/01/2024
7 शिरोडा, रेडी, वेंगुर्ला 20/1/2024
8 झरेबांबार, पिकुळे, दोडामार्ग 21/1/2024
9 खंबाळे, सांगुळवाडी, वैभववाडी 22/1/2024
10 तिवरे, पियाळी, कणकवली 23/1/2024

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा