You are currently viewing अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळ आयोजित राज्यस्तरीय काव्यसंमेलन व पुरस्कार वितरण सोहळा रविवारी रंगणार वर्ध्यात

अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळ आयोजित राज्यस्तरीय काव्यसंमेलन व पुरस्कार वितरण सोहळा रविवारी रंगणार वर्ध्यात

*अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळ आयोजित राज्यस्तरीय काव्यसंमेलन व पुरस्कार वितरण सोहळा रविवारी रंगणार वर्ध्यात.*

रविवार दिनांक २७ नोव्हेंबर २०२२ रोजी वर्धा येथे राज्यस्तरीय काव्यसंमेलन व राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे…अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळ आयोजित राज्यस्तरीय काव्य संमेलन आणि राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री मा. नितीन गडकरीजी ( परिवहन व विकास मंत्री ) यांच्या शुभहस्ते होणार आहे तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष पद ज्येष्ठ साहित्यिक मा. डॉ.जयप्रकाश घुमटकर उर्फ कवी गोल घुमट हे भूषविणार आहेत.


अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष पंडित शंकर प्रसाद अग्निहोत्री -अध्यक्ष श्री.महाकाली शिक्षण संस्था, वर्धा मुख्य अतिथी खासदार मा. रामदासजी तडस, आमदार डॉ. पंकजभाऊ भोयर असतील. या काव्यसंमेलन व पुरस्कार वितरण कार्यक्रमासाठी विशेष अतिथी ज्येष्ठ कवी मा. सुरेश लोहार (कराड ), मा. सिद्धेश्वर कोळी ( धाराशिव)
( महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष) मा. सिध्दार्थ कुलकर्णी (नागपूर)
( विदर्भ विभाग प्रदेश अध्यक्ष ) ज्येष्ठ कवयत्री मा. रेखा दिक्षीत ( कोल्हापूर )
मा. विनायकराव जाधव (कराड)
महारष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष, मा. डॉ. बळवंत भोयर ( नागपूर ) नागपूर जिल्हा अध्यक्ष उपस्थित राहणार असून प्रमुख पाहुणे मा. अर्चनाताई वानखेडे (वर्धा) ( सामाजिक कार्यकर्ती ), मा. संदीप जोशी
( माजी महापौर , नागपूर ) मा.विठ्ठलराव अवचट ( हिंगणघाट.. माजी प्राचार्य, बिडकर महाविद्यालय ) मा. नागोजी गाणार ( माजी आमदार नागपूर विभाग ) मा. रामदासजी आंबटकर ( आमदार विधानपरिषद सदस्य )
अखिल भारतीय मराठी साहित्य चळवळीचे मुख्य केंद्र मराठी साहित्य मंडळ आयोजित काव्यसंमेलन व राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याच्या मुख्य आयोजिका कवयित्री लता हेडाऊ ( वर्धा शहर अध्यक्ष, मराठी साहित्य मंडळ ) सहआयोजक… चैताली केळझरकर, स्वाती बिजवे, छाया भालकर, पंकजा महाबुध्दे व कविता बोकडे तर निवेदिका म्हणून कवयित्री अंजली कांबळे आणि सूत्र संचालन कवयित्री वैशाली गायकवाड करणार आहेत. रविवार दिनांक २७ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ठीक १०.०० वाजता कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. सदरचे संमेलन शिवशंकर सभागृह, जय महाकाली शिक्षण संस्था, अग्निहोत्री कॉलेज,लेप्रसि फौंडेशन जवळ, रामनगर, वर्धा येथे पार पडणार असून मराठी साहित्य मंडळाकडून साहित्य प्रेमींना उपस्थित राहण्याचे आग्रहाचे आवाहन केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

9 + 4 =