“सदाबहार जेष्ठ मित्राची अकाली एक्झिट”

“सदाबहार जेष्ठ मित्राची अकाली एक्झिट”

सावंतवाडी

मी सावंतवाडीत महाविद्यालयीन शिक्षणासाठी १९८१ मध्ये आलो.सावंतवाडीतील कला क्षेत्राशी, शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक कुटुंबांशी..व्यक्तींशी जोडला गेलो.त्या अनेक व्यक्तीपैकी आमचे जेष्ठ मित्र अशोकभाई कोरगावकर.आकर्षक व्यक्तीमत्व,टोकदार मिशी आणि मिस्कील स्वभाव पण तेवढेच प्रेमळ.कुणाचीही भीडभाड न ठेवता जे असेल ते रोखठोक बोलणारे.गांधीचौकात त्यांचे दुचाकी दुरुस्तीचे वर्कशॉप असताना मी अनेकदा माझी स्कुटर दुरुस्तीला द्यायचो.

मला आठवत मी एकदा माझी बजाज चेतक दुरूस्तीला दिली होती.गाडीचं काम बरचं होत.ते मला दुरुस्तीच तपशील सांगत होते..आणि मी पुढचे पुढचे प्रश्न त्यांना विचारत होतो..शेवटी ते मला म्हणाले,”पार्सेकरानो,डॉ.कडे गेल्यावर असे खोलात जावनं प्रश्न विचारतात…आणि ते तुमका सगळ्या प्रश्नांची उत्तरा दिततं..?.तब्येत बरी झाल्याशी कारण…तुमची गाडी दुरूस्त.झाली काय झाला….त्यांच्या मिश्कील स्वभावाच्या अनेक आठवणी आहेत.

त्यांची एक सगळ्यात मोठी खासियत जी सर्वांना ज्ञात आहे.खरं तर त्यांच्या अकौंटला संपत्ती किती आहे हे नगण्य पण त्यांच्या खात्यात पुण्य मात्र भरपूर जमा आहे.सावंतवाडीत कुणाचेही निधन झाले तर स्मशानभूमीतील सर्व आवश्यक सोपस्कार पूर्ण करायला अशोक कोरगावकर नाहीत असं कधीतरी क्वचित घडलं असेल.या कामासाठी पहिला फोन अशोकरावांना जायचा.स्मशानभूमीतही ते त्या वातवरणातही निधन पावलेल्याच्या आप्तेष्टांना मानसिक आधार द्यायचे.

सुमारे सात आठ वर्षापूर्वीची गोष्ट आहे.सावंतवाडीतील एका कुटुंबातील जेष्ठ व्यक्तीचे निधन झाले होते.सदर कुटुंबाशी शेजारी पाजारी किंवा नातेवाईकांच टोकाचे वितुष्ट असल्याने कुणी यायला बघेना.त्या व्यक्तीने मला फोन केला.मी गेलो पण निधन झालेली व्यक्ती ही वजनदार असल्याने बाँडी स्मशानभूमीत नेणे जरा कठीण होत.मी त्यांच्या नातेवाईकांनाही फोन केला पण कुणी फोन घेईना .मग मला श़भर टक्के या कामात मदत करणाऱ्या आमच्या अशोकरावांची आठवण झाली. त्यांना फोन केला.पाचव्या मिनिटात ते हजर.ते आल्यावर त्यांनी पुढची सगळी व्यवस्था करुन अवघ्या दिड तासात विषय मार्गी लावला.

ज्यानी आतापर्यंत शेकडो लोकांना खांदा दिला.ज्यानी असंख्य वेळा आपला कामधंदा टाकून अनेकांचे अंत्यसंस्कार केले…तेच आमचे मित्र आज त्याच उप्रलच्या स्मशानभूमीत अगदी शांतपणे जाणार ही कल्पनाच सहन होत नाही. सदाबहार जेष्ठ मित्राची अशी अकाली एक्झिट वेदनादायक आणि दुःखदायक आहे.

हे दुःख पचविण्याची ताकद श्री देव.पाटेकर त्यांच्या कुटुंबियांना देवो हीच प्रार्थना..

Ashokrao we miss you always..

…भावपूर्ण आदरांजली….

…एँड.नकुल पार्सेकर…

प्रतिक्रिया व्यक्त करा