You are currently viewing सिंधुदुर्ग वैद्यकिय महाविद्यालयासाठी आजच्या विधानसभा अधिवेशनात वित्त विभागाने मांडलेली 966 कोटीची पुरवणी मागणी मंजूर

सिंधुदुर्ग वैद्यकिय महाविद्यालयासाठी आजच्या विधानसभा अधिवेशनात वित्त विभागाने मांडलेली 966 कोटीची पुरवणी मागणी मंजूर

 

वैद्यकीय महाविद्यालयासाठी आता कोणत्याही अडचणी नाही. काम जलदगतीने होणार आहे. यासाठी इंडियन मेडिकल कौन्सिल याच्याकडुन लवकरात लवकर तपासणी होण्यासाठी पाठपुरावा सुरू असून लवकरच तपासण्या पूर्ण करू. असा आत्मविश्वास शिवसेना लोकसभा गटनेते खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केला.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्याच्या समस्या दूर होण्यासाठी जिल्ह्यामध्ये कमतरता असलेले डॉक्टर मिळणे आवश्यक आहे. बाहेरील डॉक्टर जिल्ह्यामध्ये येत नसल्यामुळे जिल्ह्यामध्ये वैद्यकीय महाविद्यालय निर्माण झाल्यास स्थानिक डॉक्टर निर्माण होतील व ते जिल्ह्यामध्ये आपली सेवा देतील. या उद्देशाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून मागणी करून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करून घेतले. सिंधुदुर्गात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे. यासाठी खा. विनायक राऊत यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे विनंती केली होती. त्या विनंतीची मुख्यमंत्री ठाकरे यांनी तात्काळ दखल घेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी दिली. ते महाविद्यालय येत्या शैक्षणिक वर्षापासुन सुरू व्हावे. यासाठी खा. राऊत, पालकमंत्री उदय सामंत, आमदार वैभव नाईक, आमदार दीपक केसरकर यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्या महाविद्यालयाला बजेट मध्ये 966 कोटी रूपये निधीची तरतुद केली असुन पदांनाही मंजुरी दिली आहे. आता एनएमसीची टीम तपासणीसाठी येणार आहे. ती टिम येवून गेल्यानंतर खर्‍या अर्थाने महाविद्यालयाच्या कामाला अधीक गती मिळेल आणि येणार्‍या शैक्षणिक वर्षात मुलांना महाविद्यालयात प्रवेश मिळेल. त्यासाठी आपले प्रयत्न असल्याचे खा. राऊत यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × five =