You are currently viewing पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई द्या

पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई द्या

कणकवली

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून महसूल प्रशासनाने या गंभीर समस्येची तात्काळ दखल घेऊन शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून नुकसानीचे पंचनामे करून भात व तत्सम पिकांचे झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मोबदला जाहीर करावी असे निवेदन मनसे उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री यांनी प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांना दिले आहे.

मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पावसाचा कहर चालु असुन हा शेतकरी जनतेला चिंतेत टाकणारा पाऊस आहे. शेतकऱ्याच्या हाता तोंडाशी आलेला घास शेतकऱ्यांच्या तोंडातून निघून गेलाय. मात्र शासन प्रशासन अद्यापही सुशेगात असल्याचे पहावयास मिळते. अगदी पेरणी पासून ते भात कापणीपर्यंत शेतकरी बांधव आपल्या शेतात राबत असतो. मात्र या सगळ्या कष्टावर अवकाळी पावसाने कहर केला असुन तोंडी आलेला घास हिरावला गेलाय. शेवटी शेतकऱ्याला अपेक्षा राहते ती फक्त शासकीय मदतीची.. नुकसानभरपाईची…! असे असतानाही शासन प्रशासनाच्या पायऱ्या त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना चढाव्या लागतात. मग हे अधिकारी फक्त कार्यालयात बसून करतात काय? शेतकऱ्यानी करायचे काय ? कोणीतरी प्रशासकीय अधिकारी येणार, पाहाणी करणार आणि आपल्या झालेल्या पिकाच्या नुकसानीची भरपाई देणार…? या विवंचंनेत नुकसानग्रस्त शेतकरी आहे.असे मनसे उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा