You are currently viewing तरंदळे फाटा येथे एस.टी. बस थांबणेबाबत

तरंदळे फाटा येथे एस.टी. बस थांबणेबाबत

कृषी सेल जिल्हाध्यक्ष समीर आचरेकर यांचे विभाग नियंत्रक, कणकवली यांना निवेदन सादर

कणकवली

कणकवली जानवली येथून हायवेने जाणाऱ्या काही एस.टी. बसेस तरंदळे फाटा येथे थांबत नाहीत. या आधी नागरिकांनी या संदर्भात विभाग नियंत्रक कणकवली कार्यालयाकडे पत्रव्यवहार केलेला आहे. पण त्याची दखल घेतली गेली नाही.

तरंदळे फाटा येथे बस स्टॉप असूनही काही बसेस स्टॉप वर न थांबल्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे. शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक यांना पायपीट करत कणकवलीच्या दिशेने यावे लागत आहे. तरी लवकरात लवकर या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन तरंदळे स्टॉप वर बसेस थांबवण्यात याव्यात. अशा आशयाचे पत्र राष्ट्रवादी पार्टी कृषी विभाग जिल्हाध्यक्ष समीर आचरेकर यांनी विभाग नियंत्रक कणकवली यांना दिले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा