You are currently viewing पळसंब शाळा नं. 1 येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

पळसंब शाळा नं. 1 येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

मालवण :

आजच्या गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाची सुरुवात संत ज्ञानेश्वर महाराज प्रतिमेच पुजन व पुष्पहार माजी सरपंच श्री. चंद्रकांत गोलतकर याच्या हस्ते करण्यात आले. त्यानतंर पळसंब शाळेवर कामगिरीवर आलेल्या सौ. बागवे मॅडम याच स्वागत करण्यात आले.

गुरुनी दिला ज्ञानरूपी वसा
आम्ही चालवू हा पुढे वारसा
पिता बंधु स्नेही तुझी माऊली
तुम्ही कल्पवृक्षातली माऊली
तुम्ही सूर्य आम्हा दिला कवडसा
जिथे काल अंकुर बिजातले
तिथे आज वेलीवरी ही फुले
फलद्रुप हा वृक्ष व्हावा तसा
शिकु धिरता शुरता विरता
धरु थोर विधेसते नम्रता
मनी ध्यास हा एक लाभो असा
जरी दृष्ठ मोठी करू शासन
गुवी सज्जनांचे करू पालन
मनी मानसी हाच आहे वसा
तुझी त्याग सेवा फळाये अशी
तुझी किर्ती वाढेल दाही दिशी
अश्या पुन्यवंता भल्या माणसा

त्यानंतर शाळा मुख्याध्यापक श्री. विनोद कदम सर यांनी तबला सात व सौ. पवार मॅडम हार्मोनियम वादन करत सुंदर रित्या प्रार्थनेने शानदार सुरुवात केली.  त्यानंतर पसायदान झाले.

त्यानंतर शाळेतील मुली कु .दिव्या परब व सानिका सावंत हिने माजी सरपंच श्री चंद्रकांत गोलतकर यांना औष्णण करत गुरुवंदना घेतली. त्यावेळी श्री. गोलतकर यांनी बोलताना’ परमात्म्याला ज्याने ही सृष्ठी निर्माण केली, आई वडीलांनी ज्यानी मला जन्म दिला, गुरुवर्यांनी ज्यांनी विद्या दिली, आपल्या सर्वाना ज्यांच्या मुळे या जगण्याचा अर्थ मिळाला. या सर्वाना माझ्याकडून गुरु पौर्णिमेच्या शुभेच्या असे मनोगत व्यक्त केले.

शाळा अध्यक्ष श्री रविकांत सावंत, उपाध्यक्ष रमेश मुणगेकर, अमरेश पुजारे उपस्थित होते. त्यानंतर सर्व पालकांच्या पायाचे मुलांनी पुजन करत गुरुवंदना घेतली.

त्यावेळी पालक माता सौ. अमृता वने, सौ. प्रिया चव्हाण, सौ. नंदिनी लाड, नमीता सावंत, आशा पळसंबकर, सानीका सावंत, काजोल मुणगेकर, सविता जंगले, गौरी परब, रुपा सावंत (ग्राम पंचायत सदस्य), शाळेतील मुले, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा