You are currently viewing गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी कोकणी व मालवणी, मराठी भाषेत वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करु नये – परशुराम उपरकर

गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी कोकणी व मालवणी, मराठी भाषेत वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करु नये – परशुराम उपरकर

कणकवली

कोकणी परिषदेला घेण्यासाठी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आले होते.जरी कोकणी भाषा असली तरी आमची बोलीव भाषा ही मालवणी आहे.राज्य सरकारने मराठी भाषेला अभिजात दर्जासाठी केंद्राकडे प्रस्ताव दिला आहे.मात्र,गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी कोकणी वादाची ठिणगी सिंधुदुर्ग जिल्ह्यात टाकण्याची गरज नव्हती.या कोकणी परिषदेला स्थानिक आमदारांनी लावलेली उपस्थिती चुकीची आहे.गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी कोकणी व मालवणी भाषेत वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करु नये,असा इशारा मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी लगावला आहे.

कणकवली येथील मनसे संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

बबालकांच्या लहानपणी कोकणी भाषेचे बाल साहित्य देण्याचा निर्णय गोव्यात आहे,त्याप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात करण्याचे गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले,हा प्रयत्न चुकीचा आहे.त्या कोकणी परिषदेला स्थानिक आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित राहून पाठींबा देणं चुकीचा असल्याचा आरोप परशुराम उपरकर यांनी केला.

मालवणी ही बोली भाषेसाठी वापरतो. मालवणी माणूस कुठेही गेला तरी मालवणीच बोलू लागले आहेत. मी आमदार असताना विधानपरिषदेत अर्थसंकल्पात मालवणी भाषेत बोलणार एकमेव आमदार होतो.गोव्याची कोकणी व मालवणी भाषेत वाद करण्याचा प्रयत्न आहे.गोव्यात कोकणी भाषा ख्रिश्चन सारखी आहे ,त्यात मराठी वाद आहे.गोवा मुख्यमंत्री आणून कोकणी भाषेचा निमित्ताने वाद करण्याचा प्रयत्न केला जात आहे.त्यांनी गोव्यापुरते कोकणी भाषेचा प्रसार मर्यादित ठेवावा. महाराष्ट्र राज्यात मराठी,कोकणी-मालवाणी वाद निर्माण करु नये.त्यामुळेच तरुणांनी पाठ फिरवली आहे.जिल्ह्यातील तरुणांनी कोंकणी भाषेचा चुकीचा प्रसार करण्याऱ्या लोकांना रोखण्याचा काम केलं पाहीजे.चित्रपट महोत्सवात गोवा मुख्यमंत्री सहभागी का झाले नाहीत?गोव्याची कोकणी भाषामहाराष्ट्र राज्यात आणण्याची गरज नाही,असा टोला परशुराम उपरकर यांनी केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

19 − 19 =