You are currently viewing भाजपा व सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघाच्या वतीने वेंगुर्ले आगाराला दिल्या एस. टी. वर्धापनदिनाच्या शुभेच्छा

भाजपा व सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघाच्या वतीने वेंगुर्ले आगाराला दिल्या एस. टी. वर्धापनदिनाच्या शुभेच्छा

वेंगुर्ले

एस.टी.चा वर्धापन दिन १ जून रोजी साजरा होतो. आज या वर्धापनदिनानिमित्त वेंगुर्ले भाजपा व सेवा शक्ती संघर्ष एस टी कर्मचारी संघाच्या वतीने वेंगुर्ले आगार व्यवस्थापक राहुल कुंभार यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. तसेच वर्कशॉप मध्ये जाऊन कर्मचाऱ्यांना लाडु वाटप करुन शुभेच्छा दिल्या.
दि.१ जुन,१९४८ रोजी पहिली एस.टी. पुणे ते अहमदनगर या मार्गावर धावली. गेली ७५ वर्षे अविरतपणे प्रवासी ग्राहकांना सेवा देत आहे. एस‌.टी.चे पहिले चालक तुकाराम पांडुरंग पठारे आणि वाहक लक्ष्मण केवटे हे होते. वाहक केवटे यांचे हल्लीच निधन झाले आहे. सुरुवातीला या दोघांना आदरांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई, तालुक्याध्यक्ष सुहास गवंडळकर, ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर, खरेदी विक्री संघाचे चेअरमन ज्ञानेश्वर केळजी, एस टी बॅक संचालक उमेदवार भरत चव्हाण, सेवाशक्ती संघर्ष युनियन चे आगार उपाध्यक्ष भाऊ सावळ, विभागीय सहसचिव महादेव भगत तसेच कर्मचारी उपस्थित होते .

प्रतिक्रिया व्यक्त करा