You are currently viewing वेंगुर्ले पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदी मोहन बापू भोई यांची नियुक्ती

वेंगुर्ले पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदी मोहन बापू भोई यांची नियुक्ती

वेंगुर्ले :

 

वेंगुर्ले पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदाचा आज मोहन बापू भोई यांनी पदभार स्वीकारला. विद्यमान प्रभारी गटविकास अधिकारी विद्याधर सुतार यांच्यासह अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांचे स्वागत केले.

कुडाळ तालुक्यातील केरवडे येथील श्री. भोई हे सद्या सावंतवाडी पंचायत समिती मध्ये सहाय्यक गटविकास अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांनी आज वेंगुर्ले पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदाचा पदभार स्वीकारला. यापूर्वी त्यांनी लघु पाटबंधारे, कुडाळ येथे कनिष्ठ सहाय्यक उपअभियंता, वेंगुर्ले पंचायत समिती मध्ये वरिष्ठ सहाय्यक, सिंधुदुर्ग जिल्हा परिषद शिक्षण माध्यमिक विभाग येथे अधीक्षक, कणकवली पंचायत समितीमध्ये कक्ष अधिकारी म्हणून काम केले आहे. दरम्यान त्यांनी आज पदाचा पदभार स्वीकारताच वेंगुर्ले पंचायत समितीच्या अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांचे स्वागत केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fifteen + four =