You are currently viewing मुणगे भगवती हायस्कूलच्या दीक्षा मुणगेकरचा विज्ञान मेळाव्यात तृतीय क्रमांक

मुणगे भगवती हायस्कूलच्या दीक्षा मुणगेकरचा विज्ञान मेळाव्यात तृतीय क्रमांक

देवगड:

 

देवगड तालुक्यातील मुणगे श्री भगवती हायस्कूलने तालुकास्तरीय विज्ञान मेळाव्यात तृतीय क्रमांक मिळविला. माध्यमिक विद्यालय जामसंडे येथे तालुकास्तरीय विज्ञान मेळावा नुकताच झाला. यामध्ये तालुक्यातील चौदा शाळांनी सहभाग घेतला. त्यामधून मुणगे श्री भगवती हायस्कूलच्या वतीने भरड धान्य पौष्टिक आहार की आहार भ्रम या विषयावर दहावीची विद्यार्थिनी दीक्षा रवींद्र मुणगेकर हिने सादरीकरण केले. यामध्ये तिने तृतीय क्रमांक पटकावला. तिला विज्ञान शिक्षक प्रसाद बागवे यांचे मार्गदर्शन लाभले. दीक्षा हिच्या यशा बद्दल अभिनंदन होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

18 + seventeen =