You are currently viewing मराठा समाजाची गुरुवारी होणारी बैठक, शुक्रवारी होणार

मराठा समाजाची गुरुवारी होणारी बैठक, शुक्रवारी होणार

सावंतवाडी

सावंतवाडी मराठा समाजाची गुरुवार दिनांक २६ सप्टेंबर रोजी होणारी बैठक शुक्रवारी २५ सप्टेंबर रोजी घेण्याचे निश्चित केले आहे.
काही गावातील मराठा समाज बांधवांनी सह्या गोळा करण्यासाठी एक दिवसाची मुदतवाढ द्यावी अशी मागणी केल्याने बैठकीची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. शुक्रवार दिनांक 25 सप्टेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजता आरपीडी हायस्कूलच्या सभागृहात सावंतवाडी तालुक्यातून आलेली निवेदन स्विकारण्यात येणार आहेत.
तालुक्यातील सर्व मराठा समाज बांधवांनी आपल्या गावात सह्यांची मोहीम राबवून शैक्षणिक व नोकरी आरक्षण कायम राहण्यासाठी सरकारवर दबाव तंत्राचा वापर करावा म्हणून हि सह्यांची मोहीम राबविण्यात येत आहे. तरी जास्तीत जास्त मराठा समाज बांधवांनी सह्या गोळा करून त्या शुक्रवार पर्यंत सावंतवाडी येथील बैठकीत आणून द्याव्यात असे आवाहन मराठा समाजाचे अध्यक्ष सीताराम गावडे उपाध्यक्ष लक्ष्मण नाईक सेक्रेटरी आकाश मिसाळ त्यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 + 17 =