You are currently viewing सिंधुदुर्ग सुपुत्र मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचे निधन

सिंधुदुर्ग सुपुत्र मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचे निधन

कणकवली :

कुडाळ कुसबे गावाचे सुपुत्र शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) मुंबईचे जेष्ठ नेते, माजी महापौर प्रि. विश्वनाथ महाडेश्वर (६३) यांचे मंगळवारी २ वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले.

त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी सांताकृझ पूर्व, पटेल नगर सर्विस रोड येथील राजे संभाजी विद्यालयात दुपारी २ वा. ठेवण्यात येईल. त्यांनंतर दुपारी ४ वा.अंत्ययात्रा टीचर्स कॉलनी येथील स्मशान भूमीच्या दिशेने निघेल.

मुंबईचे माजी महापौर चार वेळा नगरसेवक राहिलेले एक अभ्यासू नगरसेवक, सिंधुदूर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुका कुसबे गावचे पुत्र, ज्यांचे शिक्षण कसाल येथील शाळेत झाले होते. एक लढव्याया बाळासाहेब ठाकरे यांच्या कट्टर शिवसैनिक यांचे हृदय विकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × 3 =