You are currently viewing अभिनव फाऊंडेशन व ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरे आयोजित युद्ध कला प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

अभिनव फाऊंडेशन व ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरे आयोजित युद्ध कला प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

सावंतवाडी

अभिनव फाऊंडेशन व ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित युद्ध कला प्रशिक्षण शिबिराला चांगलाप्रतिसाद लाभला.

सोमवार, दिनांक ३१ ऑक्टोबर, २०२२रोजी शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन ग्रामपंचायत मळेवाड कोंडुळे सरपंच मिलन पार्सेकर,उपसरपंच हेमंत मराठे, ग्रा पं सदस्य महेश शिरसाट यांच्या उपस्थित संपन्न झाला.यावेळी आपले मनोगत व्यक्त करत असताना उपसरपंचमुलांना युद्धातील साहित्यव साधने यांची ओळख व्हावी तसेच स्वसंरक्षण कसे करावे याचेयाची कला आत्मसात व्हावी यासाठी या शिबिराचे आयोजन केले असल्याचे मत व्यक्त केले.तसेच शिबिरासाठी श्री गजानन महाराज सेवा मंडळ मळेवाड यांनी मोफत जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल देवस्थान समिती व पदाधिकारी यांचे आभार मानले.
अभिनव फाऊंडेशन,सावंतवाडी व ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित युद्ध कला प्रशिक्षण शिबिराला विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला.

प्रतिक्रिया व्यक्त करा