डॉ. चितारी यांना सावंतवाडी रुग्णालयात ताबडतोब कार्यरत करा

डॉ. चितारी यांना सावंतवाडी रुग्णालयात ताबडतोब कार्यरत करा

डॉक्टर चितारी यांना सावंतवाडी रुग्णालयात ताबडतोब कार्यरत करण्याबाबत

सावंतवाडी / प्रतिनिधी :-

सावंतवाडी रूग्णालय हे एकमेव शासकीय रुग्णालय आहे जेथे सावंतवाडी तालुक्यातील गोरगरीब रुग्णांचे उपचार होतात आणि डॉक्टर चितारी यांची निवडणूक झाल्यापासून संपूर्ण तालुक्यातील गोरगरिबांना त्यांचा मोठ्या प्रमाणात फायदा होतो डॉक्टर चितारी हे हृदय रोगतज्ञ असल्याने तसेच ते सध्या रुग्णालयात कार्यरत असल्याने त्यासंदर्भात असणाऱ्या रुग्णांची फार मोठी गैरसोय होत आहे त्यामुळे तालुक्यातील संपूर्ण स्तरावरून डॉक्टर चितारी हे पुन्हा सावंतवाडी रुग्णालयात कार्यरत व्हावे अशी मागणी होत आहे.

या सर्व बाबींचा विचार करून दिनांक 9 सप्टेंबर 2020 रोजी सकाळी 10:30 वाजेपर्यंत डॉक्टर चितारी यांची नेमणूक सावंतवाडी रुग्णालयात व्हावी अन्यथा स्वतः विजय कदम राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष न्याय विभाग ठीक 11:00 वाजता आपल्या रुग्णालयात समोर उपोषण करेन अशा प्रकारचे निवेदन राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी जिल्हा सिंधुदुर्ग सामाजिक न्याय विभाग यांच्याकडून वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी यांना देण्यात आले.

विजय कदम सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष योगेश जाधव सावंतवाडी तालुकाध्यक्ष सामाजिक न्याय विभाग सुनिल सावंत आर्यन रेडीज विनायक रेडीज राष्ट्रवादी कार्यकर्ते पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा