You are currently viewing उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते सपत्नीक कार्तिकी एकादशीनिमित्त महापूजा संपन्न

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते सपत्नीक कार्तिकी एकादशीनिमित्त महापूजा संपन्न

राज्यात सुख शांती नांदावी,वारीची परंपरा कायम सुरू राहावी, यासाठी विठ्ठलाकडे घातले साकडे

पंढरपूर

अजित पवारांच्या हस्ते सपत्नीक कार्तिकी एकादशीनिमित्त महापूजा संपन्न; उपमुख्यमंत्र्यांनी विठ्ठलाकडे घातले ‘हे’ साकडे
राज्यात सुख शांती नांदावी. वारीची परंपरा कायम सुरू राहावी, यासाठी विठ्ठलाकडे साकडे घातल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलताना सांगितले.
विठ्ठलाच्या शासकीय महापूजेसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे पंढरपूर येथे आले होते. महा पूजेनंतर मंदिर समितीने घेतलेल्या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे, मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ औसेकर महाराज, कार्यकारी अधिकारी गजानन गुरव, विशेष प्रशासकीय अधिकारी सचिन ढोले, हभप ज्ञानेश्वर महाराज जळगावकर देशमुख, साधना भोसले, शकुंतला नडगिरे, तलाठी राजेन्द्र वाघमारे, मंडळ अधिकारी विजय शिवशरण उपस्थित होते.


पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, सध्या चायना , रशिया व युरोप मध्ये कोरोनाने तोंडवर काढले आहे. आरोग्य विभागाच्या सुचानेनेच नागरिकांनी कोरोना बाबत उपचार घ्यावेत. कोरोना संपला नाही. प्रत्येकाने दुसरा डोस देखील घ्यावा असे आवाहन राज्यातील जनतेला पवार यांनी केले. यावेळी सारिका भरणे, मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प गहिनीनाथ औसेकर महाराज, नगराध्यक्षा साधना भोसले, समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, संभाजी शिंदे, अतुलशास्त्री भगरे, शकुंतला नडगिरे, पोलीस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया, जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर
मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, अप्पर पोलिस अधीक्षक हिम्मत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, मंदिर समितीचे अधिकारी गजानन गुरव आदी महसूल, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, ग्रामीण पोलीस दलातील प्रमुख अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

वारकऱ्यांनला महापूजेचा मान

यंदाच्या वर्षी हा मान कोंडीबा देवराव टोणगे (वय ५८) व पऱ्यागबाई कोंडीबा टोणगे (वय ५५, रा. निळा, सोनखेड, ता.लोहा, जि.नांदेड) यांना मिळाला असून हे पती-पत्नी मागील तीस वर्षापासून विठुरायाचे यात्रा करत असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांनी दिली

प्रतिक्रिया व्यक्त करा