You are currently viewing प्रवासी ग्राहकांना चांगली सेवा देऊ- संजयकुमार भोवड रथसप्तमी-राष्ट्रीय प्रवासी दिन साजरा.

प्रवासी ग्राहकांना चांगली सेवा देऊ- संजयकुमार भोवड रथसप्तमी-राष्ट्रीय प्रवासी दिन साजरा.

वैभववाडी.

आजही सर्वसामान्य प्रवासी ग्राहकांचा एसटीवर विश्वास आहे. प्रवासी ग्राहकांना एसटी महामंडळाच्यावतीने चांगली सेवा- सुविधा देण्याचा प्रयत्न केला जाईल असे वैभववाडीचे वाहतूक नियंत्रक श्री.संजयकुमार भोवड यांनी सांगितले.महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघ आणि ग्राहक पंचायत महाराष्ट्र, सिंधुदुर्ग जिल्हा शाखा यांच्यावतीने दिनांक १९ फेब्रुवारी रथसप्तमी- राष्ट्रीय प्रवासी दिन कार्यक्रम वैभववाडी एसटी स्टँडमध्ये संपन्न झाला.


यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे वैभववाडीचे पोलीस निरीक्षक श्री.अतुल जाधव, वैभववाडीचे वाहतूक नियंत्रक श्री.संजयकुमार भोवड, ग्राहक पंचायत महाराष्ट्र- सिंधुदुर्ग जिल्हा शाखेचे जिल्हाध्यक्ष प्रा. श्री. एस. एन.पाटील, महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघाचे नूतन जिल्हाध्यक्ष श्री.तेजस साळुंखे, जिल्हा संघटक श्री.जितेंद्र पिसे, वैभवावाडी व्यापारी मंडळाचे अध्यक्ष श्री.मनोज सावंत, पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री.मारुती कांबळे, माजी मुख्याध्यापक श्री.पी.एन. साळुंखे, श्री.शैलेंद्रकुमार परब, श्री.डी.ए. साटम आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वामी विवेकानंद प्रतिमा पूजन करण्यात आले. भारतीय ग्राहक चळवळीचे प्रणेते, ग्राहकतीर्थ स्व.बिंदुमाधव जोशी यांनी १९८९ साली रथसप्तमी या दिवशी ‘महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघ’ या संस्थेची स्थापना केली. रथसप्तमी हा दिवस राष्ट्रीय प्रवासी दिन म्हणून साजरा केला जातो. प्रवासी हा सुद्धा एक ग्राहक आहे. त्याचे हक्क आणि अधिकारांचे संवर्धन व्हावे या उद्देशाने ही संस्था स्थापन करण्यात आली.

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये ही संस्था कार्यरत असून ग्राहकांच्या प्रश्नांबाबत काम करीत आहे.प्रवासी ग्राहक, एसटी चालक व वाहक यांनी चांगली सेवा दिल्याबद्दल आणि यापुढेही द्यावी म्हणून त्यांचा सत्कार करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे प्रास्तविक भाषणात प्रा.एस.एन.पाटील यांनी सांगितले.
महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघ आणि ग्राहक पंचायत महाराष्ट्र या संस्था खऱ्या अर्थाने ग्राहक जागृतीचे कार्य करीत आहेत. आमच्या पोलीस विभागामार्फत योग्य ते सहकार्य या संस्थांना राहील असे कार्यक्रममाचे प्रमुख पाहुणे वैभववाडीचे पोलीस निरीक्षक श्री.अतुल जाधव यांनी सांगितले.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते आरती राणे, पल्लवी पांचाळ, प्रतीक्षा सुतार, स्मिता मोरे, अंजली चव्हाण, योगिता परब या विद्यार्थी ग्राहकांचा तसेच उपस्थित एसटी चालक व वाहक यांचा पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सुमंत साळुंखे, मनोज सावंत, मंगेश कदम, रविकांत अडुळकर, कुमार स्वामी, सचिन सावंत, अजय करपे, शेखर रावराणे व वैभव परब यांंचा पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री शैलेंद्रकुमार परब यांनी केले तर आभार कुमार स्वामी यांनी मांडले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 − eight =