You are currently viewing दिवाळी

दिवाळी

जागतिक मराठी साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या कवयित्री सौ.आदिती मसुरकर यांची काव्यरचना

सोनपावलांनी आज,
आली दिवाळी घरी …
दिव्यांची आरास करून,
सडा रांगोळी घालू दारी….

बांधू मातीचे किल्ले ,
आठवू शिवबांची नीती…
मिणमिणत्या प्रकाशात,
उजळवू घराच्या भिंती….

एकमेका फराळ देऊन.
जपूया मनातील नाती….
विसरू हेवेदावे सारे,
पेटवू तेजाच्या वाती…..

नेऊ लख्ख प्रकाश,
गरिबांच्या झोपडीत…
देऊया हास्य सुमने,
दिनांच्या ओंजळीत….

*🖋️©सौ.आदिती मसुरकर*
*कुडाळ ,सिंधुदुर्ग*

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × two =