You are currently viewing रेशमी बंध

रेशमी बंध

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*रेशमी बंध*

 

झुळझुळे अंतरंगी

बंध रेशमी नात्याचे

भाव गुंफलेले त्यात

स्नेह प्रेम कौतुकाचे….

 

आईबाबा आजी नाना

भाऊ बहिण लाडाची

आजोळचा गोतावळा

साथ मिळे वात्सल्याची….

 

सारे आप्तेष्ट मिळुनी

चढ उतार साहती

धीर देती एकमेका

सुख दुःखात सोबती…..

 

मैत्री असते ही दृढ

जणू सहाण चंदन

सहवास आनंदाचा

गातं मनातील गाणं….

 

गोफ रेशमी नात्यांचा

एकसंध ठेवी घर

माया ममता जपत

घाली मायेची पाखर….।।

 

~~~~~~~~~~~~~~~

*अरुणा दुद्दलवार@✍️*

प्रतिक्रिया व्यक्त करा