You are currently viewing जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन

जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी :

येत्या चोवीस तासात जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांनी वर्तवली आहे. तसेच दक्षिण महाराष्ट्र व गोवा किनाऱ्यावर प्रतितास 45 ते 55 किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहेत. तरी या कालावधीत मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यव्यस्थापन कक्षातर्फे करण्यात आले आहे.

अतिवृष्टीच्या कालावधीत नागरिकांनी पुढील दक्षता घ्यावी. आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडणे टाळा. घराबाहेर किंवा असुरक्षित ठिकाणी असल्यास पाऊस थांबेपर्यंत सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. अतिमुसळधार व अतिवृष्टीच्या परिस्थितीमधअये सुरक्षित ठिकाणी सहाव व पायी किंवा वाहनाने प्रवास करू नका, घरा बाहेर पडणे अत्यावश्यक असल्यास निघण्यापूर्वी अधिकृत स्त्रोतांकडून हवामानाची, रस्ते वाहतुकीची व पाणी तुंबलेल्या ठिकाणांची माहिती घ्या, विजा चमकत असताना झाडाखाली उभारू नका, मोबाईलवर संभाषण करू नका, इलेक्ट्रीक वस्तूंपासून दूर रहावे, पक्के घर किंवा इमारतीचा आसरा घ्यावा, मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या कोणत्याही प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदतीसाठई जिल्हा नियंत्रण कक्ष 02362-228847 किवा टोल फ्री क्रमांक 1077 वा संपर्क करावा. तसेच तालुका नियंत्रण कक्ष दोडमार्ग – 02363-256518, सावंतवाडी – 02363-272028, वेंगुर्ला – 02366-262053, कुडाळ – 02362-222525, मालवण – 02365-252045, कणकवली – 02367-232025, देवगड – 02364-262204,वैभववाडी – 02367-237239 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. हवामानाची माहिती भारतीय हवामान खात्याच्या www.imdmumbai.gov.in या संकेतस्थळावरून घ्यावी. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, अफवा पसरवू नका, कुठल्याही बातमीची खात्री अधिकृत सूत्रांकडून करुन घ्यावी किंवा जिल्हा नियंत्रण कक्ष किंवा टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, आपत्कालीन परिस्थिती उद्भावण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी राहत असल्यास जागरूक रहावे व प्रशासनास सहकार्य करावे, पूरप्रवण क्षेत्र व पाणी तुंबण्याची ठिकाणे यावर आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्याबाबत जागरूक सहावे व योग्य ती दक्षता घ्यावी.  जुन्या, मोडकळीस आलेल्या इमारती, पूल इत्यादी ठिकाणी जाऊ नये, अतिवृष्टीमुळे ठिकठिकाणी अडकलेल्या लोकांची तातडीने सुटका करण्यासाठी त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी रुग्णवाहिका, पट्टीचे पोहणारे , जेसीबी मशिन इ. उपलब्ध करून देण्यासाठी नागरिकांनी आपला सक्रीय सहभाग द्यावा, अतिवृष्टीच्या काळात कोणीही समुद्र, नदी, नाले या ठिकाणी जाऊ नये, वाहन चालवताना योग्य ती काळजी घ्यावी, पुराच्या पाण्यात, समुद्रात नागरिकांनी सेल्फी काढू नये, आपत्कालीन स्थितीत सेल्फी काढून नागरिकांनी स्वतःचा जीव धोक्यात घालू नये, जिल्ह्यातील वर्षा पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना नागरिकांनी या ठिकाणच्या धोक्यांची जाणीव करुन द्यावी व या पर्यटकांना देखील धोकादायक ठिकाणी सेल्फी काढण्यापासून परावृत्त करावे, हवानान विभागाकडून दिलेल्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आफल्या जीवित व मालमत्तेची काळजी घ्यावी असे आवाहन शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सिंधुदुर्ग यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × five =