You are currently viewing खेळाडू प्रशिक्षण आणि इतर बाबीसाठी आर्थिक सहाय्य मिळण्यासाठी प्रस्ताव सादर करावा 

खेळाडू प्रशिक्षण आणि इतर बाबीसाठी आर्थिक सहाय्य मिळण्यासाठी प्रस्ताव सादर करावा 

– जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस

सिंधुदुर्गनगरी

अधिकृत आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तसेच सहभागी झालेल्या होतकरु खेळाडूंना प्रशिक्षण व इतर बाबीसाठी आर्थिक सहाय्य मिळण्यासाठी प्रस्ताव सादर करावाअसे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी केले आहे.                                        

राज्यातील खेळाडूंना अधिकृत आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातील खेळाडूंना आर्थिक सहाय्य देणे बाबतचा शासन निर्णयामध्ये नमूद १४ अधिकृत आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये सहभागी झालेल्या खेळाडुंना पुढील बाबींसाठी अर्थसहाय्य अनुज्ञेय आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठीचा प्रवास खर्चप्रवेश शुल्कनिवासभोजन इ. देश विदेशातील स्पर्धापूर्व प्रशिक्षण उपकरणेतज्ञ क्रीडा प्रशिक्षकांचे मार्गदर्शन शुल्कप्रशिक्षण कार्यक्रम शुल्क,  आधुनिक क्रीडा साहीत्य आयात / खरेदी करणेगणवेश इ.  या योजनेसाठी पुढील स्पर्धा अधिकृत स्पर्धा म्हणून मान्यता दिली आहे. ऑलिम्पिक गेम्सविश्व अजिंक्यपद स्पर्धाएशियन गेम्सराष्ट्रकुल स्पर्धाराष्ट्रकुल युवा स्पर्धाएशियन चॅम्पियपशिपयुथ ऑलिम्पिकज्यु. विश्व अजिंक्यपद स्पर्धाशालेय आशियाई/जागतिक स्पर्धापॅरा ऑलिम्पिक स्पर्धापॅरा एशियन स्पर्धाज्युनियर एशियन चॅम्पियनशिपएशियन कपवर्ल्ड कप या स्पर्धा आहेत. ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये त्या खेळ / क्रीडा प्रकारांचा समावेश असेल तेच खेळ / क्रीडा प्रकार वरील नमूद इतर स्पर्धांमध्ये आर्थिक सहाय्य मिळण्यास अनुज्ञेय होतील. मात्र अपवाद कबड्डीखो-खोमल्लखांब या देशी खेळांचा अपवाद उपरोक्त शासन निर्णयान्वये करण्यात आलेला आहे.        उपरोक्त विविध अधिकृत आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी किंवा सहभागी झालेल्या खेळाडूंना या योजनेचा लाभ घेण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज परिपूर्ण भरुन आवश्यक कागदपत्रांसह संबंधित जिल्हयाचे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत किंवा आयुक्तक्रीडा व युवक सेवासंचलनालयमहाराष्ट्र राज्यशिवछत्रपती क्रीडा संकुलम्हाळुगे बालेवाडीपुणे यांचेकडे सादर करण्याचे आवाहन ओम प्रकाश बकोरियाआयुक्त, ,क्रीडा व युवक सेवामहाराष्ट्र राज्यपुणे यांनी केले आहे.      

           राज्यात क्रीडा संस्कृतीची जोपासना व संवर्धन परिणामकारक करण्याच्या दृष्टीने तसेच राज्यातील खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर दर्जेदार कामगिरी करुन पदक विजेते खेळाडू तयार व्हावेतयासाठी क्रीडा विषयक तंत्रशुध्द प्रशिक्षणखेळांडूच्या दर्जात सुधारणादर्जेदार पायाभूत सुविधाखेळाडुंचा गौरवक्रीडा प्रशिक्षकांना अद्ययावत तंत्रज्ञानाची ओळख या बाबी विचारात घेऊन क्रीडा धोरण २०१२ तयार करण्यात आले आहे.

        अर्जाचा नमुना क्रीडा विभागाच्या sports.maharastra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. याबाबत अधिक माहिती करिता आपले जिल्हयाचे जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे कार्यालय किंवा क्रीडा व युवक सेवा संचालनालयशिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे-बालेवाडीपुणे येथील कार्यालयाशी संपर्क साधावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा