You are currently viewing देवगड तालुक्यातील ७२ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर…

देवगड तालुक्यातील ७२ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर…

देवगड-:

तालुक्यातील ७२ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत गुरूवारी जाहीर झाली असून नुकत्याच सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल जाहीर झालेल्या २३ ग्रामपंचायतींपैकी १९ ग्रामपंचायतींवर सर्वसाधारण प्रवर्गातील सदस्य सरपंचपदी विराजमान होणार आहेत. शिरगांव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचे आरक्षण अनुसुचित जाती महिला वर्गासाठी पडले मात्र या प्रवर्गातील सदस्य नसल्याने शिरगांव ग्रामपंचायतीचे सरपंच पद रिक्त राहणार आहे. या आरक्षणाबाबत शिरगावमधील शिवसेना पदाधिकारी व ग्रामस्थांनी हरकत घेतली मात्र तहसिलदारांना हरकत फेटाळून लावली. देवगड तालुक्यातील ७२ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत शालेय विद्यार्थी मित प्रसाद कुळकर्णी व विद्यार्थीनी दिव्या देवीदास कुबल या दोघांच्या हस्ते चिठ्ठया काढून जामसंडे येथील स्वामी समर्थ मंगल कार्यालयात काढण्यात आली.तहसिलदार मारूती कांबळे, नायब तहसिलदार जी.के.सावंत, एस्.व्ही.गवस, महसुल सहाय्यक अ‍े.व्ही.गिरी यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडली. प्रवर्गानुसार सरपंचपदाचे पडलेले/निश्चित केलेले आरक्षण व त्या ग्रामपंचायती अनुसुचित जाती प्रवर्ग- कुवळे, बुरंबावडे अनुसुचित जाती महिला प्रवर्ग- वळीवंडे, शिरगाव अनुसुचित जमाती महिला प्रवर्ग- विजयदूर्ग नागरिकांचा मागास प्रवर्ग- मिठमुंबरी, दहिबांव, वरेरी, चाफेड, महाळूंगे, चांदोशी, मोंडपार, पडेल, किंजवडे नागरिकांचा मागास प्रवर्ग(महिला)- साळशी, ठाकूरवाडी, गढीताम्हाणे, पोंभुर्ले, तिर्लोट, विठ्ठलादेवी, कुणकवण, कोटकामते, वानिवडे, गोवळ सर्वसाधारण प्रवर्ग- नाडण, पेंढरी, मणचे, टेंबवली, कुणकेश्वर, वाडा, फणसे, ओंबळ, दाभोळे, इळये, नाद, वाघिवरे, खुडी, पाळेकरवाडी, तळवडे, पाटगांव, पाटथर, हिंदळे, पावणाई, नारींग्रे, बापर्डे, सांडवे, मिठबांव व कोर्ले सर्वसाधारण प्रवर्ग(महिला)- तांबळडेग, आरे, गवाणे, रामेश्वर, पोयरे, कातवण, उंडील, हडपीड, वाघोटन, मुणगे, पुरळ, पडवणे, गिर्ये, मुटाट, कट्टा, तोरसोळे, शिरवली, सौंदाळे, मळेगाव,लिंगडाळ,रहाटेश्वर, मोंड, फणसगाव, धालवली आरक्षण सोडत प्रक्रियेवेळी स.पो.निरिक्षक संजय कातिवले यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

प्रतिक्रिया व्यक्त करा

12 + 8 =