You are currently viewing बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये जागतिक मानसिक आरोग्य व जनजागृती सप्ताह…

बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये जागतिक मानसिक आरोग्य व जनजागृती सप्ताह…

कुडाळ :

जागतिक मानसिक आरोग्य व जनजागृती सप्ताहानिमित्त बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये स्पोर्ट्स आणि प्रेरणा, पेंटिंग : मानसिक उत्सर्जनाचे एक साधन असे विविध उपक्रम या सप्ताहात आयोजित करण्यात आले होते. त्या मध्येच एक रघुकुल स्वरविहार सावंतवाडीच्या ईश्वरी तेजम आणि सहकारी यांच्या उपस्थितीमध्ये *संगीत एक ध्यानसाधना आणि संगीताचा मानसिक आरोग्यासाठी फायदा या विषयावर एक कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली. बॅरिस्टर नाथ पै जन्मशताब्दी निमित्त बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये विविध उपक्रम घेण्यात येत असून जागतिक मानसिक आरोग्य व जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आलेले आहे. मानसिक आरोग्यासाठी ध्यान आणि संगीताची आराधना ही किती फायदेशीर ठरते. यासाठी संगीत आराधनेचे आरोग्यावरील सकारात्मक परिणाम, तसेच संगीतामुळे आपले विचार कसे सकारात्मक बनतात.संगीत हे तणावमुक्त जीवन जगण्यासाठी किती आवश्यक आहे? आनंदी जीवन जगण्यासाठी मिळणारी प्रेरणा संगीताच्या साधनेतून कशी मिळू शकते ?…यासंदर्भातलं प्रात्यक्षिकासहित मार्गदर्शन करण्यात आले. आॉफलाईन शाळेच्या पहिल्या दिवशी अशा मनोरंजक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्यामुळे. विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमांमध्ये उत्साहाने सहभाग नोंदविला. बॅरिस्टर नाथ पै फिजिओथेरपी महाविद्यालय, नर्सिंग महाविद्यालय ,सी.बी.एस.इ सेंट्रल स्कूलचे विद्यार्थी व शिक्षक प्राध्यापकांच्या उपस्थितीमध्ये ही कार्यशाळा संपन्न झाली. ४ ऑक्टोबर पासून सदर सप्ताहाला सुरुवात झाली असून मानसिक आरोग्यासाठी विविध विषयावर छोटे छोटे वर्कशॉप ही घेण्यात आलेले आहेत.संस्थेचा मानव संसाधन विकास व विविध अभ्यासक्रमाच्या विशेष प्रयत्नातून व उमेश गाळवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 + three =