You are currently viewing मसूरे डांगमोडे येथे अमली पदार्थ मुक्त सिंधुदुर्ग अभियान जनजागृती फेरी

मसूरे डांगमोडे येथे अमली पदार्थ मुक्त सिंधुदुर्ग अभियान जनजागृती फेरी

मसुरे :

मसूरे डांगमोडे  येथे अमली पदार्थ मुक्त सिंधुदुर्ग अभियान जनजागृती फेरी मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या उपस्थितीत काढण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक श्री प्रवीण कोल्हे यांनी श्री देव रवळनाथ मंदिर येथे उपस्थित  ग्रामस्थांना अमली पदार्थ मुक्ती शपथ दिली व नशामुक्ती बाबत मार्गदर्शन केले. यावेळी मसुरे बिट अंमलदार श्री प्रमोद नाईक, मसूरे पोलीस विवेक फरांदे यांचे सहकार्य लाभले. यावेळी माजी प. स. सदस्य सौ.गायत्री ठाकूर, पोलीस पाटील सोमा ठाकूर, शशांक ठाकूर, साईप्रसाद बागवे, प्रेरणा येसजी, प्राजक्ता पेडणेकर, सुरेखा गावकर, अभिजित दुखंडे, सोनल भोगले, ऐशाबी सय्यद आदी पोलीस पाटील यांच्या सह बहुसंख्य डांगमोडे ग्रामस्थ, महिला उपस्थित होत्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा