You are currently viewing उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना डंपरची हुल

उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना डंपरची हुल

*सावंतवाडी*

मार्च एन्डची वसुली करण्यासाठी आलेल्या उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना डंपर चालकाने हूल दिल्याने एकच गोंधळ उडाला. या कारवाईविरोधात डंपर चालक, मालक आक्रमक असताना असा प्रकार घडल्याने उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याने थेट पोलीस ठाणे गाठत या डंपर चालकावर कारवाईची मागणी केली आहे. मात्र उशिरापर्यंत याबाबत चर्चा सुरू होती.

मळगाव बायपासवर वेत्ये येथे हे कोल्हापूर येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी थांबले होते. या पथकाला एका डंपर चालकाने हूल दिली. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. आरटीओ पथक आणि डंपर चालक, मालक संघटनेत वाद झाला. या वादानंतर आरटीओ पथकाने सावंतवाडी पोलीस स्थानक गाठत पोलीस संरक्षणाची मागणी केली.

तसेच घडलेला प्रकार तक्रार स्वरूपात देणार असल्याचे सांगितले.

यावेळी दत्तप्रसाद डंपर चालक मालक संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र गावकर यांनी, कारवाई करायची असल्यास सर्व अनधिकृत व्यवसायांवर करावी, फक्त डंपर चालकांना लक्ष्य करू नये. असे पुन्हा घडल्यास आंदोलन करू, असा इशारा दिला आहे. यावेळी त्यांनी जिल्ह्यात आरटीओ पथक असताना बाहेरून पथक आणून कारवाई केली जाते?, असा प्रश्न जितेंद्र गावकर यांना उपस्थित केला आहे.

दरम्यान, हे उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचे विशेष पथक सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले असून ही पथके कोल्हापूर येथील आहेत. शासनाला जास्तीत जास्त महसूल गोळा करून देणे हाच यामागचा उद्देश असल्याचे सांगितले जात आहे. मात्र चुकीच्या कारवाईमुळे डंपर चालकही आक्रमक झाले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा