You are currently viewing जिल्ह्यातील आशाताईंना देणार “ब्रेस्ट कॅन्सर” तपासणीचे “ट्रेनिंग” – डाॅ. विवेक रेडकर

जिल्ह्यातील आशाताईंना देणार “ब्रेस्ट कॅन्सर” तपासणीचे “ट्रेनिंग” – डाॅ. विवेक रेडकर

सावंतवाडी

जिल्ह्यात “ब्रेस्ट कॅन्सर”चे प्रमाण देशाच्या तुलनेत दुप्पट आहे, अशी खंत व्यक्त करीत येथे जनजागृती तसेच महिलांची प्राथमिक तपासणी होण्यासाठी जिल्ह्यातील २०० हून अधिक आशाताईंना रेडकर रिसर्च सेंटरच्या माध्यमातून तपासणी करण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे, अशी माहिती सेंटरचे प्रमुख डॉ. विवेक रेडकर यांनी दिली. दरम्यान जिल्ह्यात मेडिकल टुरिझमसाठी मोठा वाव आहे. त्यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी पाठपुरावा करावा. त्याचबरोबर जिल्ह्यात फिजिओथेरपी सेंटर व्हावे यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आग्रही भूमिका ठेवावी, अशीही मागणी त्यांनी यावेळी केली. रेडकर रिसर्च सेंटरच्या माध्यमातून रेडी येथे सुरू करण्यात आलेल्या “विसावा” या केंद्राचे शुभारंभ श्री. प्रभू यांच्या प्रमुख उपस्थित झाला.
यावेळी आयोजित कार्यक्रमात रेडकर बोलत होते. यावेळी ते म्हणाले, आम्ही विसावा केंद्राच्या माध्यमातून म्हातारपणात अनेक लोकांना हक्काचा हात मिळावा, त्यांचे पालन पोषण चांगले व्हावे यासाठी प्रयत्न करत आहोत. रेडकर हॉस्पिटल व रिसर्च सेंटरच्या माध्यमातून यापूर्वी अनेक प्रकल्प राबविण्यात आले. या दिलासा सारखा प्रकल्प यशस्वी झाला आहे. त्यामुळे आणखी सामाजिक काम करून लोकांसाठी काहीतरी करायचे आहे. हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आमची वाटचाल सुरू आहे.

यावेळी रेडकर म्हणाले, मी डॉक्टर म्हणून जिल्ह्याचा रिसर्च केल्यानंतर सिंधुदुर्गात ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण दुप्पट असल्याचे निदर्शनास आले. दुसरीकडे अनेक महिला या लाजेने किंवा भीतीने आपल्याला झालेली समस्या किंवा आजार पुढे येऊन सांगत नाहीत, असे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे यापुढे रिसर्च सेंटरच्या माध्यमातून आम्ही जिल्ह्यातील २०० हून अधिक आशाताईंना कॅन्सर तपासणीचे ट्रेनिंग देणार आहे. जेणेकरून जिल्ह्यात डॉक्टर नाहीत या समस्येमुळे रुग्णाला बसणारा फटका कमी होऊ शकतो. भविष्यात लोकांच्या सेवेसाठी रेडकर रिसर्च ची वाटचाल सुरू आहे. जिल्ह्यात फिजिओथेरपी सेंटर व्हावे आणि त्या माध्यमातून रुग्णांना सेवा मिळावी, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावा, मेडिकल टुरिझमला मोठ्या प्रमाणात वाव आहे. अनेक विदेशी पर्यटन या ठिकाणी येऊन मेडिकलच्या सोयी घेऊ शकतात आणि दुसरीकडे पर्यटन सुद्धा करू शकतात. त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होऊ शकते. त्यासाठी केंद्र स्तरावर आवश्यक असलेल्या पाठपुरावा प्रभू यांच्यासह अन्य नेत्यांनी करावा, असे त्यांनी सांगितले

प्रतिक्रिया व्यक्त करा

eighteen + 4 =