You are currently viewing निरवडे-सिद्धार्थनगर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण…

निरवडे-सिद्धार्थनगर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण…

सावंतवाडी

निरवडे सिद्धार्थनगर येथे उभारण्यात आलेल्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण आज मान्यवरांच्या हस्ते दिमाखात करण्यात आले. येथील सिद्धार्थ युवा कला-क्रीडा मंडळाच्या वतीने डॉ.आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी निरवडे सरपंच हरी वारंग, जिल्हा परिषद सदस्य उत्तम पांढरे, माजी सरपंच प्रमोद गावडे, सर्व ग्रामपंचायत सदस्य व गावातील ग्रामस्थ सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमा निमित्त आयोजित अभिवादन सभेत प्राध्यापक देवदास बोर्डे व प्रमोद चव्हाण यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी गावातील विविध मान्यवर तसेच आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × one =