You are currently viewing शासकीय मेडिकल कॉलेजमुळे जिल्ह्याचा विकास होईल 

शासकीय मेडिकल कॉलेजमुळे जिल्ह्याचा विकास होईल 

जिल्ह्याच्या विकासासाठी राणे कुटुंब नेहमीच पुढे

आमदार नितेश राणे

कणकवली

अमित शाह आणि नारायण राणे यांच्या दिल्लीतील भेटीनंतर सिंधुदुर्गातील शासकीय मेडिकल कॉलेजला मिळालेली मान्यता रद्द करण्यात आली असा सोशल मीडियावर प्रचार सुरू आहे. राणेंच्या खाजगी मेडिकल कॉलेज चे उद्घाटन फेब्रुवारी महिन्यात खुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्तेच झाले होते. त्यामुळे आपल्या खाजगी मेडिकल कॉलेज ला जिल्ह्यातील शासकीय मेडिकल कॉलेजमुळे फटका बसु शकेल हा विषय शाह आणि राणे यांच्यात नुकत्याच दिल्लीत झालेल्या बैठकीत आला असेल आणि त्यामुळेच शासकीय मेडिकल कॉलेजला मिळालेली मंजुरी अवघ्या 48 तासांत रद्द करण्यात आली असावी असा प्रचार सोशल मीडियावर सुरू आहे.

याबाबत आमदार नितेश राणेंना विचारले असता नितेश यांनी ही त्यांची म्हणजेच विरोधकांची संकुचित वृत्ती असल्याचे सांगत विरोधकांवर निशाणा साधला. शासकीय मेडिकल कॉलेज साठी अपुरा स्टाफ, लॅबोरेटरी, लायब्ररी आदी त्रुटी काढण्यात आल्या आहेत. आमचे खाजगी मेडिकल कॉलेज आहे. जिल्ह्यात शासकीय मेडिकल कॉलेज झाले तर जिल्ह्याचा आणखी विकास होईल. आम्ही जिल्ह्याच्या विकासाआड कधीच नव्हतो आणि येणारही नाही. 2014 पासून 2019 पर्यंत शिवसेनेचे अरविंद सावंत केंद्रात मंत्री होते. तेव्हा भाजपा आणि शिवसेनेची आघाडी होती.मग तेव्हा चिपी विमानतळाला परवानगी का मिळाली नाही ? असा सवालही आमदार नितेश यांनी केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा