You are currently viewing वंचित बहुजन युवा आघाडी सिंधुदुर्गच्या वतीने रिया आळवेकर यांची सदिच्छा भेट

वंचित बहुजन युवा आघाडी सिंधुदुर्गच्या वतीने रिया आळवेकर यांची सदिच्छा भेट

ओरोस :

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रथम तृतीय पंथी शिक्षिका आद. रियाताई आळवेकर यांची धावती भेट घेतली. आज सांयकाळी नियोजित कार्यक्रमासाठी कोल्हापूर येथे मुलाखती साठी बाहेर पडणाऱ्या रियाताई यांची ओरोस येथे भेट घेतली. वंचित बहुजन युवा आघाडी चे जिल्हाध्यक्ष रोहन कदम यांनी रियाताईंचे भरभरून कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी रियाताई यांनी आपला प्रविण वारंग ते रिया आळवेकर पर्यंतचा प्रवास बोलताना म्हणाल्या कि, आजचा दिवस खुपच आनंदाचा आहे. आजच त्यांच्या पुर्वीच्या शाळेची कमिटी ओरोस येथे येऊन जिल्हा परिषद शिक्षण विभागाला विनंती केली कि दुसऱ्या शिक्षक देण्यापेक्षा आम्हाला याच शिक्षिका द्या. पुरुषांचे कपडे घालून शिकवणारी रियाताई आज हक्काने पाट येथील शाळेमध्ये रुजू होण्यासाठी ची ऑर्डर मिळाली. पाट गावच्या जनतेने रियाताईंना स्वीकारले ही अभिमानाची गोष्ट आहे. पाट गावच्या जनतेचे ही रोहन कदम यांनी कौतुक केले. यावेळी वंचित बहुजन युवा आघाडी चे उप जिल्हाध्यक्ष पंढरी पावसकर, सभासद भिकाजी जाधव, कुडाळ तालुका महासचिव अमोल पावसकर उपस्थित होते

प्रतिक्रिया व्यक्त करा

eight + 10 =