You are currently viewing व्यावसायिक अभ्यासक्रम सामाईक प्रवेश परीक्षा 25 सप्टेंबर ते 1 ऑक्टोंबर 2021 रोजी ऑनलाईन

व्यावसायिक अभ्यासक्रम सामाईक प्रवेश परीक्षा 25 सप्टेंबर ते 1 ऑक्टोंबर 2021 रोजी ऑनलाईन

सिंधुदुर्गनगरी

सन 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र व कृषी तंत्रज्ञान या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येणाऱ्या MHT-CET ही सामाईक प्रवेश परीक्षा दि.25 सप्टेंबर ते 1 ऑक्टोंबर 2021 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 6.45 या वेळेत घेण्यात येणार आहे, अशी माहिती प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयकृष्ण फड यांनी दिली.

            जिल्ह्यात ही परीक्षा एस.एस.पी.एम.कॉलेज ऑफ इंजिनियरिंग, कणकवली  या उपकेंद्रावर घेण्यात येणार आहे, या परीक्षेला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या 1 हजार 356 इतकी आहे. तरी सर्व संबंधित विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी

प्रतिक्रिया व्यक्त करा