You are currently viewing कै. उदय खानोलकर वाचन मंदिर तर्फे मळगांवात ९ रोजी होणार माजी सैनिकांचा गौरव

कै. उदय खानोलकर वाचन मंदिर तर्फे मळगांवात ९ रोजी होणार माजी सैनिकांचा गौरव

सावंतवाडी

मळगाव येथील कै. उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिरच्यावतीने ‘भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त’ मळगाव गावातील सैनिक व माजी सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सत्कार समारंभ आयोजित केला आहे.

हा कार्यक्रम वाचनालयाच्या ‘रमाकांत खानोलकर’ सभागृहात रविवार तारीख ९ जानेवारी २०२२ रोजी सायंकाळी ४.३० वाजता संपन्न होणार आहे.

या कार्यक्रमासाठी सेवानिवृत्त कर्नल विजयकुमार सावंत यांना निमंत्रित केले असून त्यांच्या हस्ते उपस्थित सैनिकांचा यथोचित सत्कार करण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमासाठी सर्व ग्रामस्थ, हितचिंतक व सैनिकांप्रती आदर असणाऱ्या लोकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन कै. उदय खानोलकर वाचनमंदिरतर्फे करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × 1 =