You are currently viewing तिलारी धरणाचा डावा कालवा खानयाळेत फुटला

तिलारी धरणाचा डावा कालवा खानयाळेत फुटला

दोडामार्ग

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात मोठे समजले जाणारे मातीचे धरण तिराळी याचा गोवा महाराष्ट्र यांना पाणीपुरवठा करणारा कालवा काल खानयाळे येथे फुटला, पाणी येळपई नदीला आल्याने ऐन उन्हाळ्यात लोकांनी पुरसदृश्य स्थिती अनुभवली.तर तिराळी दोडामार्ग हा राज्य मार्ग दोन तासापेक्षा जास्त काळ बंद राहिला.

तिलारी विभागाचे या कालव्यांकडे होत असलेले वारंवार दुर्लक्ष तसेच ठेकेदाराचा मनमानी कारभार हा या कालवा फुटीला जबाबदार असल्याचे येथील नागरिकांतून बोलले जात होते. या अगोदर वारंवार अनेक वृत्तपत्रे तसेच वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी भगदाड पडल्याचे सांगण्यात येत होते,मात्र निद्रिस्त असलेल्या तिलारी विभागाला त्याची जाग येत नव्हती त्याचा परिणाम म्हणून काल  दुपारी तीनच्या सुमारास खानयाळे येथे कालव्याला मोठे भगदाड पडून कालवा फुटला यामुळे तेथील माती व पाणी लोकांच्या शेतात गेल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.तर उन्हाळ्यात शेतीला पाणीपुरवठा करणारा हा कालवा बंद होत असल्यामुळे शेती करपण्याची भीती शेतकर्‍यांतून व्यक्त होताना दिसत आहे. तर हे पाणी येळपई नदीला आल्याने ऐन उन्हाळ्यात लोकांनी पुरसदृश्य स्थिती अनुभवली.तर तिराळी दोडामार्ग हा राज्य मार्ग दोन तासापेक्षा जास्त काळ बंद राहिला.
अधिकाऱ्यांचे वारंवार होणारे दुर्लक्ष त्याचप्रमाणे कालवा या ठिकाणी अस्तित्वात असतानाही त्याचे कार्यालय या ठिकाणाहून ४० किलोमीटर वर नेऊन ठेवणे कितपत योग्य आहे? त्यामुळे अशा घटना वारंवार घडत आहेत मात्र याकडे हा विभाग पूर्णपणे कानाडोळा करतो आहे त्याचे परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत आहेत, शासनाबरोबर याठिकाणचे आमदार,पालकमंत्री लोकप्रतिनिधी यांचेही लक्ष नाही कालव्यांची योग्य दुरुस्ती देखभाल होत नाही, अधिकारी वर्गाला याचे सोयर सुतक नाही, त्यामुळे या कालव्याचे पुर्ण ऑडिट होऊन हा कालवा जोपर्यंत पूर्णतः दुरुस्त केला जात नाही तोपर्यंत यातून पाणी सोडू देणार नसल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र निंबाळकर यांनी दिला आहे.
तर खासदार विनायक राऊत यांनी या घटनेची माहिती घेतल्याचे व त्यावर चौकशी होणार असल्याचे विभागप्रमुख संतोष मोर्ये यांनी सांगत आज या कालव्या विषयी तसेच तिराळी विभागाची कार्यालये तिराळीत आणा यासाठीचे नियोजित उपोषण होणार असल्याचे स्पष्ट केले.
यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी संजय गवस, लक्ष्मण आयनोडकर, विजय जाधव, मिलिंद नाईक , भिवा गवस, नितीन मोर्ये, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र निंबाळकर, नायब तहसीलदार नाना देसाई,तिराळी विभागाचे अधिकारी, पोलीस निरीक्षक श्री घाग, साहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील तसेच अनेक सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थानी या ठिकाणी येत पाहणी केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

sixteen + four =