You are currently viewing माजी सभापती आबासाहेब रावराणे यांचे निधन

माजी सभापती आबासाहेब रावराणे यांचे निधन

वैभववाडी

माजी सभापती, लोरे नं. 2 गावचे रहिवासी बाळकृष्ण पांडुरंग रावराणे वय 90 यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. तालुक्यात ते आबासाहेब या नावाने परिचित होते. त्यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

वैभववाडी तालुका अस्तित्वात येण्यापूर्वी गगनबावडा तालुक्याचे सभापती पद त्यांनी भूषविले होते. तळकोकणातील गावांना न्याय देण्याचे काम त्यांनी केले. वैभववाडी तालुका निर्मितीत आबांचे मोठे योगदान राहिले आहे. लोरे गावचे तब्बल 25 वर्ष सरपंच पद आबांनी भूषविले होते. मुंबईचे मा. नगरसेवक अजित रावराणे यांचे ते वडील होतं. ते मनमिळावू स्वभावाचे होते. त्यांच्या पश्चात पाच मुलगे, तीन मुली, सुना, नातवंडे व पतवंडे असा मोठा परिवार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा