You are currently viewing तारकर्ली समुद्रात पर्यटकांची बोट बुडाली ; दोघांचा मृत्यू

तारकर्ली समुद्रात पर्यटकांची बोट बुडाली ; दोघांचा मृत्यू

स्कुबा डायव्हिंग करून परतत असताना दुर्घटना ; होडीत २० जणांचा होता समावेश

मालवण

तारकर्ली एमटीडीसी समोरील समुद्रात पर्यटकांना घेऊन येणारी स्कुबा डायव्हिंगची बोट उलटल्याची दुर्घटना मंगळवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास घडली. यावेळी होडीतील २० जण समुद्रात फेकले गेले. यातील दोघांचा बुडून मृत्यू झाला आहे. तर अन्य जखमींवर उपचार सुरू आहेत. अपघातानंतर जखमींना मालवणच्या ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. यावेळी रुग्णालयात नागरिकांसह राजकिय पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मदत कार्यासाठी गर्दी केली होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा

10 − 9 =