You are currently viewing आंबोली पोलीस दुरक्षेत्राचे प्रभारी हे.काँ.दत्ता देसाई वाढदिवस अभिष्टचिंतन

आंबोली पोलीस दुरक्षेत्राचे प्रभारी हे.काँ.दत्ता देसाई वाढदिवस अभिष्टचिंतन

पोलीस म्हटल्यावर अनेकांचे विचार वेगवेगळे असतात, परंतु असेही काही पोलीस कर्मचारी असतात ज्यांच्याबद्दल समाजात आदर, प्रेम भावना असते. अशीच आदरयुक्त भीती आणि तेवढेच स्नेह असलेले पोलीस म्हणजे आंबोली दुरक्षेत्राचे प्रभारी, हे.काँ.दत्ता देसाई. दत्ता देसाई यांनी सावंतवाडी, बांदा येथे प्रामाणिकपणे आपली सेवा बजावली असून सद्ध्या ते आंबोली पोलीस दूरक्षेत्राचे प्रभारी म्हणून कार्यरत आहेत. सावंतवाडी, बांदा येथे वाहतूक पोलीस म्हणून त्यांची कामगिरी उत्तम राहिली असून त्यांनी वाहतूक पोलीस म्हणून वावरताना आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती.
सावंतवाडीत वाहतूक पोलीस म्हणून कार्यरत असताना अनेक तरुणांना देसाई ड्युटीवर आहेत म्हटल्यावर समोरून जाताना सुद्धा धडकी भरायची, परंतु कित्येक शहरवासीयांचे देसाई यांच्यासोबत सलोख्याचे आपुलकीचे संबंध होते. सावंतवाडी वासीयांना दत्ता देसाई यांचा अभिमान देखील आहे, कारण कित्येकवेळा मोती तलावात बुडत असणाऱ्या व्यक्तींना आपल्या जीवाची बाजी लावून ते वाचवायचे. रस्ता अपघात असो वा तलावात आत्महत्येचा प्रयत्न दत्ता देसाई सर्वप्रथम त्याठिकाणी पोहचून मदत कार्यात स्वतःला झोकून द्यायचे. काहींना त्यांच्या सतर्कतेमुळे जीवदान देखील मिळाले होते, त्यामुळे दत्ता देसाई म्हणजे देवदूत अशीच त्यांची प्रतिमा निर्माण झाली होती. सावंतवाडीतून बांदा येथे गेल्यावरही त्यांनी आपले प्रामाणिक पोलीस सेवा कार्य सुरूच ठेवले होते. त्यामुळे कित्येकांना दत्ता देसाई हे आपलेच वाटतात.
बांदा येथून दत्ता देसाई यांची आंबोली पोलीस दूरक्षेत्रात प्रभारी म्हणून नियुक्ती झाली. पोलिसांचा सन्मान असलेले दत्ता देसाई यांचा आज वाढदिवस. संवाद मिडियाकडून हे.काँ.दत्ता देसाई यांना वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा, आणि भावी वाटचालीस सदिच्छा..

प्रतिक्रिया व्यक्त करा

19 − fifteen =