You are currently viewing कवठणी गावच्या शिरपेचात मानाचा तुरा

कवठणी गावच्या शिरपेचात मानाचा तुरा

सावंतवाडी

कवठणी (बोरवाडी), तालुका सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग येथील ग्रामस्थ  प्रदीप राघोबा रेडकर यांचे मोठे पुतणे व मुंबईत वास्तव्यास असणारे भूमिपुत्र सत्यवान यशवंत रेडकर (GROUP B OFFICER, MUMBAI CUSTOMS) यांनी एलएलबी परीक्षा उत्तीर्ण होऊन सातवी पदवी संपादन केली आहे. त्याच सोबत तिमिरातुनी तेजाकडे या सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून कोकणातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांविषयी विनामूल्य मार्गदर्शन करीत असतात, भविष्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक गावात हा उपक्रम राबवण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतलेला आहे व यासाठी विविध तालुक्यातील ग्रामपंचायत स्तरावर योग्य ते सहकार्य केले जात आहे.

शिक्षण:
१. B.COM
२. M. COM
३. M.A (HINDI)
४. POST GRADUATE DIPLOMA IN HUMAN RESOURCE MANAGEMENT
५. POST GRADUATE DIPLOMA IN LABOUR LAW AND INDUSTRY RELATION
६. POST GRADUATE DIPLOMA IN TRANSLATION
७. LLB

This Post Has One Comment

  1. SATYAWAN REDKAR

    संवाद मीडियाद्वारे मुंबई शहरात राहून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांश घडामोडी आम्हाला मोबाईलवर प्राप्त होतात. त्यासोबत मागील आठवड्यात माझ्या शैक्षणिक यशा संदर्भात माहितीस व त्या संदर्भातील बातमीस अल्पावधीत संवाद मीडियाद्वारे ऑनलाइन प्रसिद्धी दिली गेली. त्याबद्दल राजेश नाईक, विद्या बांदेकर त्याच सोबत संवाद मीडियाच्या टीमचे मनःपूर्वक आभार.

    🙏 सत्यवान रेडकर
    कनिष्ठ अनुवाद अधिकारी, मुंबई सीमाशुल्क, भारत सरकार

प्रतिक्रिया व्यक्त करा

17 − 9 =