You are currently viewing शेतमांगर कोसळून सुमारे ५० हजाराचे नुकसान

शेतमांगर कोसळून सुमारे ५० हजाराचे नुकसान

ओटवणे

ओटवणे कापईवाडी येथील अंकुश लक्ष्मण नाईक यांच्या शेतमांगराची शनिवारी रात्री एक बाजू कोसळून सुमारे ५० हजाराचे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत शेतमांगराची दुसरी बाजू जैसे थे राहिल्याने या शेतमांगरातील गाईसह वासरू बचावले. अंकुश नाईक यांच्या घरानजीकच हा शेतमांगर आहे. शनिवारी रात्री साडे दहाच्या सुमारास काही तरी कोसळल्याचा मोठा आवाज झाल्याने तसेच गाय व वासरू मोठमोठयाने हम्बरू लागल्याने अंकुश नाईक व त्यांचे भाउ विलास नाईक बॅटरी घेउन शेत मांगराच्या दिशेने आले असता त्यांना शेत मांगराची एक बाजू कोसळल्याचे दृष्टीस पडले. शेत मांगरातील गाय व वासरू सुखरूप असल्याचे पाहून त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. मात्र या घटनेत गवत पावसात भिजल्याने नुकसान झाले. तसेच लाकडी छपरासह नळे व भिंत जमीनदोस्त झाल्याने शेत मांगराचे सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले. रविवारी सकाळी शेत मांगरावर प्लास्टिक कपडा घालून छप्पराची तात्पुरती डागडुजी करण्यात आली. दरम्यान या घटनेबाबत अंकुश नाईक यांनी ओटवणे सरपंचा उत्कर्षा गावकर आणि तलाठी भक्ती सावंत यांचे लक्ष वेधले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा